मुंबई : 'पुष्पा' या चित्रपटाला मिळालेलं यश, न संपणारे कार्यक्रम आणि आगामी चित्रपटांची रिघ या साऱ्यातून वेळ काढत अभिनेता अल्लू अर्जुन सध्या स्वत:साठी वेळ काढताना दिसत आहे. चित्रपटांमध्ये बहुविध भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकणारा हा अभिनेता यासाठी त्याच्या राहत्या घरापासून, रोजच्या लोकांपासून काहीसा दूर गेला आहे. (allu arjun pushpa)
पण, चाहत्यांचा गराडा मात्र त्याला दुरावता आलेला नाही. सुट्टीसाठी म्हणून अल्लू अर्जुननं उत्तराखंडमधील आनंदा हे हॉटेल गाठलं. इथं तो अगदीच निवांत दिसला.
सोशल मीडियाच्या माध्यमातून तो उत्तराखंडमध्ये येत असल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली आणि त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी करण्यास सुरुवात केली.
विमानतळापासूबनच त्याच्यासाठीची गर्दी नजरेस पडली. पण, यावेय़ली मात्र त्यानं कोणाचीही ङेट न घेता तड़क हॉटेल गाठलं.
चाहते निराश झाले. पण, दुसऱ्याच दिशी तो ज्या हॉटेलमध्ये थांबला होता तिथं गेटवर येत अनेकजण त्याची वाट पाहताना दिसले.
पण, यावेळीही चाहत्यांचा हा प्रयत्न अपयशी ठरला. ज्यामुळं चाहते काहीसे निराश झाले. त्याचं हे वागणं काहींना खटकलं.
सध्या काही निवांत क्षणांत असणारा अल्लू अर्जुन अद्यापही चाहत्यांसमोर आलेला नाही. आता तो उरलेल्या दिवसांमध्ये उत्तराखंडमधील प्रेक्षकांची मनं कशी जिंकतो हे पाहणं महत्त्वाचं असेल.
दरम्यान, सध्या तो या निसर्गरम्य ठिकाणाचं सौंदर्य डोळ्यांत साठवत आहे . इतकंच नव्हे, तर स्थानिक खाद्यसंस्कृतीही अगदी जवळून अनुभवताना दिसत आहे.
काही दिवसांची उसंत मिळाल्यानंतर हा दाक्षिणात्य सुपरस्टार पुन्हा एकदा त्याच्या कामावर रुजू होणार आहे. त्यामुळं प्रत्यक्षात तो भेटलेला नसला तरीही येत्या काळात रुपेरी पडद्यावरून हा अभिनेता नक्कीच तुमच्या भेटीला येईल, हेच त्याच्या उत्तराखंडमधील चाहत्यांना सांगणं.