करीना, विद्या बालनसोबत जुळलं नाव, पण अभिनेत्याने अरेंज मॅरेज करत सगळ्यांनाच दिला धक्का

असंच एक कपल आहे जे सध्या भलतंच चर्चेत आहे.

Updated: Oct 10, 2022, 09:47 PM IST
करीना, विद्या बालनसोबत जुळलं नाव, पण अभिनेत्याने अरेंज मॅरेज करत सगळ्यांनाच दिला धक्का title=

Shahid Kapoor Love Story: बॉलीवूड हे जेवढं त्यांच्या चित्रपटांमुळे गाजत तेवढंच गाजतं ते बॉलीवूडच्या लव्ह अफेअर्सनी. (Popular Bollywood Love Affairs) अशीची काही लोकप्रिय जोडपी एकत्र आली होती आणि काही काळानं वेगळीही झाली. वेगळं झाल्यावर आपल्या आयुष्याची नवी सुरूवात करत त्यांनी योग्य जोडीदारासह संसारही सुरू केला. असाच एक अभिनेता त्यांच्या अफेअरसाठी बॉलीवूडमध्ये लोकप्रिय ठरला होता आणि आपल्या लग्नामुळंही हा अभिनेता विशेष चर्चेत आला होता. (how shahid kapoor married mira kapoor while staying far away from each other)

बॉलीवूडमध्ये अशी अनेक जोडपी आहे ज्यांची प्रेमकहाणी त्यांच्या चाहत्यांना माहिती असली तरी अशा अनेक गोष्टी त्यांच्या चाहत्यांपर्यंत पोहचलेल्या नाहीत. बॉलीवूडमध्ये देखील असंच एक कपल आहे जे सध्या भलतंच चर्चेत आहे आणि त्याचं नावं आहे मीरा राजपूत आणि शाहिद कपूर. (Shahid Kapoor & Mira Rajput) 

आणखी वाचा - Sridevi च्या जाऊबाईचं हॉट फोटोशूट... अनेक ग्लॅमरस अभिनेत्रींना टाकलं मागे

शाहिद कपूर एक बॉलिवूड अभिनेता आहे आणि मीरा राजपूत ही दिल्लीची मुलगी आहे. या दोघांचं एकत्र येणं मग प्रेमात पडणं आणि लग्न करणं हे एखाद्या स्वप्नापेक्षा कमी नाही. त्याचं भेटणंही त्यांच्या नशिबात कुठेतरी लिहिलं होतं अशी अलंकारिक उपमा त्यांना दिली तर वावगं ठरू नये. जरी शाहिद बी-टाऊनच्या मुलींसोबत प्रेमसंबंध वाढवत असला तरी पण त्याच्यासाठी दूर असं कोणीतरी होतं जे फक्त त्याच्यासाठी बनलं होतं आणि ती होती मीरा राजपूत. जरी दोघांच्या वयातील फरक आणि जीवनशैली यात खूप अंतर असलं तरी त्यांच्या आयुष्यात असं काही घडलं ज्यामुळे ते दोघं एकत्र आले. 

शाहिद कपूरचं नाव 9 अभिनेत्रींसोबत जोडलं जात असल्याचं बोललं गेलं. यामध्ये अमृता रावपासून करीना कपूरपर्यंतच्या त्यांच्या नायिकांचा समावेश होता. करीनासोबतच त्याचं प्रेम प्रकरण हे खूप गाजलं होतं. शाहिद आणि बेबो दोघांनीही हे नाते कधीच लपवले नाही आणि उघडपणे एकमेकांसोबत राहिले. दोघेही लग्न करणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. पण असे झाले नाही आणि 2007 मध्ये दोघांचे ब्रेकअप झाले. यानंतरही शाहिदचे नाव कधी विद्या बालनसोबत तर कधी प्रियंकासोबत जोडले गेले होते. (Shahid Kapoor love Affairs)

आणखी वाचा - आई नीतू कपूरनं Ranbir चा फोटो शेअर करतानाच नेटकरी म्हणाले...

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

एक वेळ अशी आली जेव्हा शाहिदने चित्रपटांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली होती. त्याच वेळी त्याचे कुटुंब दिल्लीतील राधा स्वामी सत्संगाला आले होते जेथे मीराच्या कुटुंबातील  व्यक्तीसोबत शाहिदची भेट झाली होती. या दोघांचे प्रकरण पुढे गेलं आणि शाहिदनेही मीराला भेटून लग्नाची तयारी दर्शवली. अखेर दोघांची भेट झाली पण त्यावेळी मीरा शाहिदच्या स्टारडमने फारशी प्रभावित झालेली दिसली नाही आणि त्यामुळेच शाहिदला मीरा आवडली. लग्न निश्चित झाले आणि दोघांनी 2015 मध्ये लग्न केले. (Shahid Mira Age Gap) मीरा शाहिदपेक्षा 12 वर्षांनी लहान होती. त्यावेळी मीरा फक्त 22 वर्षांची होती तर शाहिद 34 वर्षांचा होता.