सासरे मद्यधुंद अवस्थेत आले आणि त्यांनी छातीवर...; हनी सिंगच्या पत्नीचा खळबळजनक दावा

तिनं केलेला दावा ऐकून धक्काच बसेल 

Updated: Aug 5, 2021, 05:29 PM IST
सासरे मद्यधुंद अवस्थेत आले आणि त्यांनी छातीवर...; हनी सिंगच्या पत्नीचा खळबळजनक दावा  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : गायक आणि वादाच्या भोवऱ्यात अडकलेला रॅपर हनी सिंग (Yo Yo Honey Singh) च्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. त्याची पत्नी शालिनी तलवार (Shalini Talwar) हिनं नुकताच एक खळबळजनक दावा केला आहे. जो ऐकता क्षणार्थासाधी काहीच सुचत नाहीये. 

हनी सिंग म्हणजेच हिरदेश सिंग याच्यावर घरगुती हिंसा , मानसिक आणि लैंगिक शोषणाचे आरोप केल्यानंतर त्याचे वडील, सरदार सरबजीत सिंग यांच्यावरही शालिनीनं गंभीर आरोप केले आहेत. शालिनीनं केलेल्या दाव्यानुसार एके दिवशी ती खोलीत कपडे बदलत असताना, सासरे मद्यधुंद अवस्थेत तेथे आले. पाहता पाहता त्यांनी सासरे आणि सुनेच्या नात्याच्या मर्यादाच ओलांडल्या, असं सांगत त्यांनी आपल्या स्तनांवर हात फिरवल्याचा दावा तिनं केला. हनी सिंग आणि त्याचे कुटुंबिय मला शारीरिक इजा पोहोचवतील या भितीमुळे मी याआधी उघडपणे बोलू शकले नाही या शब्दांत तिनं भूमिका मांडली. 

हनी सिंगला कोर्टाकडून नोटीस : अनेक महिलांसोबत शरीरसंबंध असल्याचा पत्नीचा आरोप

 

एखाद्या जनावराप्रमाणं वागणूक दिली. 
दिल्लीतील हजारी न्यायालयात शालिनीनं पती आणि सासरच्यांविरोधात याचिका दाखल केली. हनी सिंगने लग्नाच्या दहा वर्षांमध्ये आपल्याला जनावरांप्रमाणं वागणूक दिल्याचाही खुलासा केला. 

नुकसान भरपाईपोटी 10 कोटींची मागणी 
सदर प्रकरणात प्रकरणात हनी सिंगच्या पत्नीने त्याच्याकडे नुकसान भरपाईपोटी 10 कोटी रुपयाची मागणी केली आहे. जनावराप्रमाणे आपल्याला वागवण्यात आलं' असं तिने म्हटलं आहे. सोबतच नवऱ्याचे अनेक महिलांसोबत शरीरसंबंध असल्याचाही तिने आरोप केलाय. दिल्लीत घरभाड्यापोटी हनी सिंगला दर महिन्याला ५ लाख रुपये देण्याचेही आदेश द्यावेत, अशी मागणी तिने याचिकेत केली आहे.