Kajol Birthday : जेव्हा शाहरुख काजोलवर भडकला, दिली धमकी

पण तिच्या याच स्वभावामुळे सुरुवातीला शाहरुख खानसोबत काजोलचे खटके उडाले होते.  

Updated: Aug 5, 2021, 05:04 PM IST
Kajol Birthday : जेव्हा शाहरुख काजोलवर भडकला, दिली धमकी  title=

मुंबई :   बॉलिवूड अभिनेत्री काजोल देवगण तिच्या स्क्रिनवरील दमदार रोमॅन्टिक अंदाजामुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे, पण ऑफ स्क्रिन काजोलचा स्वभाव अगदी वेगळा आहे. तिला बोलायला, सहकलाकारांसोबत मजामस्ती करायला फार आवडतं. पण तिच्या याच स्वभावामुळे सुरुवातीला शाहरुख खानसोबत काजोलचे खटके उडाले होते.  

'कुछ-कुछ होता है'मधील राहुल-अंजली असो, दिलवाले दुल्हनियाँ ले जाएंगे'मधील राज-सिमरन असो, शाहरुख खान आणि काजोलची जोडी ऑन स्क्रिन खुपच गाजली होती. या जोडीने आपल्या दमदार अभिनयाने आणि जबरदस्त रोमॅन्टिक अंदाजाने प्रेक्षकांची मनं जिंकली.

 खऱ्या आयुष्यात आता दोघांमध्ये चांगली मैत्री आहे. पडद्यावर या दोघांची केमिस्ट्री सगळ्यांचच लक्षवेधून घेणारी असते. पण तेव्हा सेटवर हे दोघं एकमेकांकडे पहायचे सुद्धा नाही. 'बाजीगर' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान शाहरुख-काजोलमध्ये खटके उडाले होते. काजोलचं कामात नीट लक्ष नसतं, असं शाहरुखच्या लक्षात आलं होतं आणि त्याने आमिर खानलाही तिच्यासोबत काम करू नकोस, असा सल्ला दिला.

एका जुन्या मुलाखतीत शाहरुखने याबद्दल सांगितलं आहे. "मी बाजीगर सिनेमात काम करत असताना आमिरने मला काजोलविषयी विचारलं होतं. त्याला एका चित्रपटात तिच्यासोबत काम करायचं होतं. पण मी आमिरला काजोलविषयी सर्व वाईट गोष्टीच सांगितल्या होत्या. ती खूप वाईट आहे, कामात लक्ष नसतं आणि तू तिच्यासोबत काम करू शकणार नाही. पण त्यादिवशी मला माझी चूक उमगली. आमिरला पुन्हा मी कॉल केला आणि काजोल अत्यंत चांगलं काम करत असल्याचं सांगितलं."'

"बाजीगर'च्या सेटवरच काजोल आणि शाहरुखची मैत्री झाली होती. "शाहरुख आणि इतर अभिनेते जेव्हा सेटवर झोपायचे, तेव्हा मी मराठीत जोरजोरात बोलून त्यांना उठवायची. शाहरुखला त्यावेळी मी अजिबात आवडत नव्हती. तू थोडा वेळ तरी गप्प राहशील का, असं तो मला बोलायचा. 

आता अनेकदा शाहरुख आणि काजोल यांच्या ऑफ स्क्रिन केमिस्ट्रीची देखील तितकीच चर्चा पाहायला मिळते.