पत्नीविरोधातील खटल्यावेळी कोर्टात हजर राहिलेल्या Lawyer ला डेट करतोय Johnny Depp

हॉलिवूड अभिनेता जॉनी डेप पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळीसुद्धा एक महिला तो चर्चेत येण्यास कारणीभूत ठरली आहे. Ex Wife सोबतचा वाद न्यायालयापर्यंत गेल्यानंतर त्या वादावर पडदा पडला आणि जॉनी त्याच्यावर लावण्यात आलेल्या गंभीर आरोपांपासून काहीसा दूर झाला. आता हा अभिनेता पुन्हा Limelight मध्ये येण्याचं कारण ठरतंय ते म्हणजे त्याचं नवं रिलेशनशिप Reltionship. 

Updated: Sep 23, 2022, 02:38 PM IST
पत्नीविरोधातील खटल्यावेळी कोर्टात हजर राहिलेल्या Lawyer ला डेट करतोय Johnny Depp  title=
Hollywood star Johnny Depp Dating Lawyer Joelle Rich

johnny depp : हॉलिवूड अभिनेता जॉनी डेप पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळीसुद्धा एक महिला तो चर्चेत येण्यास कारणीभूत ठरली आहे. Ex Wife सोबतचा वाद न्यायालयापर्यंत गेल्यानंतर त्या वादावर पडदा पडला आणि जॉनी त्याच्यावर लावण्यात आलेल्या गंभीर आरोपांपासून काहीसा दूर झाला. आता हा अभिनेता पुन्हा Limelight मध्ये येण्याचं कारण ठरतंय ते म्हणजे त्याचं नवं रिलेशनशिप Reltionship. 

Johnny Depp सध्या त्याच्या वतीनं न्यायालयात बाजू मांडणाऱ्या London स्थित वकील Joelle Rich ला डेट करत आहे. ती विवाहित आहे, पण सध्या मात्र पतीपासून विभक्त राहत आहे. असं असलं तरीही Joelle चा घटस्फोट होणं बाकी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Hollywood star Johnny Depp Dating Lawyer Joelle Rich)

जॉनी आणि Joelle यांच्यामध्ये असणारं नातं आता अतिशय गंभीर आणि तितक्याच महत्त्वाच्या वळणावर असल्याची माहिती त्यांच्याशी संलग्न सूत्रांनी दिली. हे नातं दीर्घकाळ टीकेल असाही अंदाज अनेकांनी व्यक्त केला आहे. 

अधिक वाचा : लिफ्टमधील Private व्हिडीओ व्हायरल होताच, Elon Musk ची जॉनी- एम्बर प्रकरणी पहिली प्रतिक्रिया

 

रिच या जॉनीची एक्स वाईफ (ex-wife Amber Heard) विरोधातील अब्रूनुकसानीच्या खटल्यात सक्रिय नव्हती. पण, अभिनेत्याला पाठींबा देण्यासाठी म्हणून ती त्यावेळीसुद्धा न्यायालयात होती. Relationship च्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये जॉनी आणि Joelle यांनी त्यांच्या भेटीगाठी हॉटेलपुरताच सीमित ठेवल्या होत्या. 

(Ex Wife) एक्स वाईफ, एम्बर हर्डनं केलेल्या गंभीर आरोपांप्रकरणी काही दिवसांपूर्वीच जॉनी न्यायालयात खटला जिंकला होता. खासगीतील क्षणांपासून जॉनीकडून मिळणाऱ्या वागणुकीपर्यंत बऱ्याच गोष्टींसंदर्भात एम्बरनं जॉनीला अडकवण्याचा प्रयत्न केला होता. पण, आरोपांना धुकडावून लावत तसे पुरावे न्यायालयात सादर करत जॉनीनं त्याची बाजू ठामपणे न्यायालयापुढे मांडलीय. संपूर्ण कलाजगताचं लक्ष या खटल्यानं वेधलं होतं.