प्रसिद्ध अभिनेता देतोय गंभीर आजाराशी झुंज; अवस्था पाहून बसणार नाही विश्वास

अभिनेत्याने नुकताच स्वतःबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. 

Updated: Jul 9, 2022, 01:03 PM IST
प्रसिद्ध अभिनेता देतोय गंभीर आजाराशी झुंज; अवस्था पाहून बसणार नाही विश्वास title=

मुंबई : हॉलिवूडचा सुप्रसिद्ध सुपरस्टार ब्रॅड पिटने नुकताच स्वतःबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. ब्रॅड म्हणाला की, तो आजकाल एका दुर्मिळ आजाराशी झुंज देत आहे. पण जेव्हा तो आपल्या आजाराबद्दल कोणाला सांगतो तेव्हा कोणीही त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. ब्रॅड पिटचा असा विश्वास आहे की, तो प्रोसोपॅग्नोसिया नावाच्या दुर्मिळ विकाराने ग्रस्त आहे.  

58 वर्षीय ब्रॅड पिटने GQ मासिकाच्या ऑगस्ट 2022 च्या कव्हर स्टोरीवर बोलताना सांगितलं की, त्याच्या आजारावर कोणीही विश्वास ठेवत नाही. त्याने असंही म्हटलं आहे की, मला अशा व्यक्तीला भेटायचं आहे जो स्वतः देखील या आजाराशी लढत आहे. ब्रॅड पिटला काळजी आहे की, कोणीही त्याला गर्विष्ठ समजणार नाही. तो स्वतः लोकांचे खरे चेहरे ओळखण्यात अपयशी ठरत आहे.

पिटला अद्याप प्रोसोपॅग्नोसियाचे औपचारिक निदान झालेलं नाही. कारण अभिनेत्याला असं म्हणायचं होतं की 2013 मध्ये त्याला प्रोसोपॅग्नोसियाचा त्रास झाल्याचा संशय होता. त्यानंतर त्यांनी एस्क्वायर मासिकाशी याबाबत चर्चा केली. संभाषणादरम्यान ब्रॅड पिट म्हणाला की, 'बरेच लोकं माझा तिरस्कार करतात, कारण त्यांना वाटतं की मी त्यांचा अपमान करत आहे.'

आपल्या आजाराविषयी बोलताना ब्रॅड म्हणाला की, त्यालाही एखाद्याचा चेहरा आठवण्यात खूप त्रास होतो. तो म्हणाला, 'मला चेहराही समजत नाही. तरीही मी डिझाइनच्या दृष्टिकोनातून ओळखण्याचा प्रयत्न करतो.  मी त्यावर उपचार करेन, म्हणूनच मी घरीच राहतो.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

ब्रॅड पिटच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर त्याने अँजेलिना जोलीशी लग्न केलं आहे. दोघांना मॅडॉक्स, पॅक्स, झाहारा, शिलो आणि जुळी मुले नॉक्स आणि विव्हिएन अशी सहा मुले आहेत. 2016 मध्ये पिट आणि जोली वेगळे झाले. 2019 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला होता. मात्र तरीही या जोडप्यामध्ये मुलांचा ताबा आणि इस्टेटबाबत कायदेशीर लढाई सुरू आहे. कामाच्या आघाडीवर, ब्रॅड लवकरच बुलेट ट्रेन या चित्रपटात दिसणार आहे.