देशात हिंदी सिनेमांपेक्षा हॉलिवूडला पसंती - डॉ. सुभाष चंद्रा

भारतात हिंदी सिनेमांपेक्षा हॉलिवूड सिनेमांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे मत, एस्सेल समूहाचे प्रमुख आणि राज्यसभा खासदार डॉ. सुभाष चंद्रा यांनी व्यक्त केले.

Updated: Nov 29, 2017, 04:54 PM IST
देशात हिंदी सिनेमांपेक्षा हॉलिवूडला पसंती - डॉ. सुभाष चंद्रा  title=

हैद्राबाद : भारतात हिंदी सिनेमांपेक्षा हॉलिवूड सिनेमांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे मत, एस्सेल समूहाचे प्रमुख आणि राज्यसभा खासदार डॉ. सुभाष चंद्रा यांनी व्यक्त केले.

येथे सुरु असलेल्या जागतिक उद्योजक परिषदेत 'सिनेमा आणि भविष्य' या विषयावर चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं. खासदार डॉ. सुभाष चंद्रा या चर्चासत्रात सहभागी झाले होते. 

तसेच अभिनेत्री आदिती राव हैदरी, निर्माता दिग्दर्शक रॉनी स्क्रूवाला आणि नेक्स पेज प्रॉडक्शनच्या सीईओ ओनरेके स्टेफनी लीनस इडाहोसा सहभागी झाले. 

यावेळी डॉ. सुभाष चंद्रा यांनी भारतीय सिनेमानं महिलांचं धाडस आणि संघर्ष पडद्यावर अगदी योग्य पद्धतीनं दाखवल्याचं म्हटलंय. सिनेमात वेगाने बदल घडत असून भारतीय सिनेमा अगदी जवळून अनुभवले आहेत. तसेच भारतात हिंदी सिनेमांपेक्षा हॉलिवूड सिनेमांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं डॉ. सुभाष चंद्रा म्हणालेत.