मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरने पाकीस्तानला दिले सडेतोड उत्तर...

 मिस वर्ल्ड २०१७ हा किताब जिंकून भारताचे नाव रोशन करणारी मानुषी छिल्लर हिने मुंबईत सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पाकीस्तानला सडेतोड उत्तर दिले.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Nov 29, 2017, 04:27 PM IST
 मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरने पाकीस्तानला दिले सडेतोड उत्तर... title=

नवी दिल्ली :   मिस वर्ल्ड २०१७ हा किताब जिंकून भारताचे नाव रोशन करणारी मानुषी छिल्लर हिने मुंबईत सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पाकीस्तानला सडेतोड उत्तर दिले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाकीस्तानला सडेतोड उत्तर

हरियाणाच्या या कन्येने मिस वर्ल्ड २०१७ हा किताब जिंकल्यावर पाकिस्तानने त्यावर चर्चा सुरू केली. आणि भारतापेक्षा सुंदर मुली बुर्केमध्ये कैद असल्याचे सांगितले. यावर मिस वर्ल्ड मानुषीने एका पत्रकार परिषदेत पाकीस्तानला सडेतोड उत्तर दिले.

काय म्हणाली मानुषी ?

मानुषीने सांगितले की, मिस वर्ल्ड म्हणजे केवळ शारीरिक सुंदरता नव्हे. तसं बघायला गेलं तर स्पर्धेतील प्रत्येक मुलगी सुंदर होती. पण तुमच्या या सौंदर्याचा तुम्ही लोकांच्या हितासाठी कसा वापर करता, हे महत्त्वाचे आहे. आणि स्पर्धेत तेच पाहिले जाते. 
मिस वर्ल्ड हा किताब सुंदर चेहरा जिंकत नाही तर सुंदर मनाचा हा पुरस्कार आहे ज्याचे प्रतिनिधित्व सुंदर चेहरा करतो. त्यात तुम्ही कोणत्या देशाचे आहात हा मुद्दा महत्त्वाचा नसतो. 

बॉलिवूडमध्ये काम ?

त्याचबरोबर बॉलिवूडमध्ये काम करण्याचा काही विचार नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र आमिर खानसोबत काम करायला आवडेल. कारण तो चोखंदळपणे भुमिका स्विकारतो. त्याचबरोबर समाजोपयोगी कार्यक्रमात सहभागी होतो.