नवी दिल्ली : बॉलिवूडमध्ये लवकरच पर्दापण करणारी जान्हवी कपूरचा ६ मार्चला २१ वा वाढदिवस होता. श्रीदेवी गेल्यानंतरचा हा तिचा पहिलाच वाढदिवस.
आईशिवायचा हा वाढदिवस तिने वृद्धाश्रमात साजरा केला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात ती आपला बर्थडे केक कापताना दिसत आहे. तिथे उपस्थित इतर लोक बर्थडे सॉन्ग गात आहेत.
श्रीदेवींच्या जाण्यानंतर जान्हवीने इंस्टग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली होती. यात तिने म्हटले होते की, कायम आपल्या आई-वडीलांवर प्रेम करा. त्यांच्यासोबत वेळ घालवा आणि नेहमी त्यांना सांगा की तुम्ही त्यांच्यावर किती प्रेम करता.
जान्हवी लवकरच धडक या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पर्दापण करणार आहे. यात ती शाहीद कपूरचा भाऊ इशान खट्टरसोबत झळकणार आहे. शूटिंगमध्ये व्यस्त असलेल्या तिने श्रीदेवींच्या जाण्यानंतर काही वेळासाठी शूटिंग थांबवले आहे.