व्ही शांताराम यांची ही लोकप्रिय गाणी तुम्हाला केव्हाही आवडतील

भारतीय सिनेसृष्टीचा उल्लेख करताना अग्रस्थानी येणारे नाव म्हणजे चित्रपती व्ही. शांताराम. त्यांचे पूर्ण नाव शांताराम राजाराम वणकुद्रे. पण व्ही.शांताराम हीच त्यांची खरी ओळख बनली.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Nov 26, 2017, 12:05 AM IST
व्ही शांताराम यांची ही लोकप्रिय गाणी तुम्हाला केव्हाही आवडतील title=

मुंबई : भारतीय सिनेसृष्टीचा उल्लेख करताना अग्रस्थानी येणारे नाव म्हणजे चित्रपती व्ही. शांताराम. त्यांचे पूर्ण नाव शांताराम राजाराम वणकुद्रे. पण व्ही.शांताराम हीच त्यांची खरी ओळख बनली.

निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता 

आपल्या कारकिर्दित त्यांच्यातील उत्तम निर्माता सर्वांच्या लक्षात राहिला. पण तेवढ्याच दर्जाचे दिग्दर्शक आणि अभिनयाची छापही पाहायला मिळाली. यांचे अनेक सिनेमा हे भविष्यासाठी प्रेरणा ठरले. अशा सिनेमातील गाण्यांच्या आठवणीत केव्हाही रमायला होते.

 जन्म 

 व्ही शांताराम यांचा जन्म १८ नोव्हेंबर १९०१ साली कोल्हापूर येथे एका कुटुंबात झाला. 

 
 'राजकमल'ची स्थापना 

१९४२ साली त्यांनी प्रभात कंपनी सोडली आणि मुंबईत राजकमल कला मंदिर ची स्थापना केली.

वडिल राजाराम आणि आई कमल यांच्या नावावरुन त्यांनी 'राजकमल' हे नाव आपल्या संस्थेला दिले. ही संस्था मराठी सिनेमांसाठी मैलाचा दगड ठरली.

गाजलेले सिनेमा

 शकुंतला(१९४३) १९४६ साली डॉ. कोटणीसांच्या जीवनावर आधारीत `डॉ. कोटणीस की अमर कहानी',राम जोशी(१९४७च्या)अपना देश( १९४९) दहेज( १९५०) तर १९५१ सालचा होनाजी बाळांचा `अमर भूपाळी', तीन हत्ती चार रस्ता( १९५३),सुराग(१९५३), सुबह का तारा( १९५४) उत्तम नृत्ये असलेला १९५५ सालचा रंगीत `झनक झनक पायल बाजे',

तुफान और दियाँ( १९५६) हे आणि असे कित्येक सिनेमा 'राजकमल' च्या सोनेरी आठवणीत जोडले गेले आहेत.