मिथुन यांचा अपमान करताना तो म्हणाला, "तू हिरो काय, खलनायक बनण्याच्या लायकीचा नाही'', पण त्यानंतर...

फिरोज खान यांची भूमिका हीच त्यांची ओळख होती. 

Updated: May 23, 2021, 06:11 PM IST
मिथुन यांचा अपमान करताना तो म्हणाला, "तू हिरो काय, खलनायक बनण्याच्या लायकीचा नाही'', पण त्यानंतर... title=

मुंबई : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते फिरोज खान कदाचित आज आपल्यात नसले तरी, त्यांचं सादरीकरण आणि चित्रपट नेहमीच त्यांची आठवण करून देतात. फिरोज खान यांची भूमिका हीच त्यांची ओळख होती. त्याचबरोबर ते बॉलिवूडचे एक मोठे निर्माताही होते. फिरोज हे यारो के यार होते. जे लोकांच्या मदतीसाठी सदैव तत्पर होते. पण कामाच्या ठिकाणी ते मैत्री फार दूर ठेवत असत. मात्र त्यांचा छोटा भाऊ अकबर खानला फिरोजच्या या सवयी बद्दल माहिती नव्हतं. कारण जेव्हा अकबर यांनी 'कुर्बानी' चित्रपटासाठी मिथुन चक्रवर्ती यांना सजेस्ट केलं. तेव्हा त्यांना आणि मिथुन या दोघांनाही खूप अपमान सहन करावा लागला. नेमकं काय घडलं त्या दिवशी जाणून घेऊ या.

1980 साली फिरोज खान यांनी 'कुर्बानी' हा चित्रपट बनवण्याची घोषणा केली. तेव्हा अमिताभ बच्चन या चित्रपटासाठी त्यांची पहिली पसंती होती. पण जेव्हा अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटात काम करण्यास नकार दिला. त्यावेळी या भूमिकेसाठी फिरोज खान यांनी बर्‍याच कलाकारांशी चर्चा केली.

त्या काळात अनेक मोठ्या कलाकारांनाही फिरोज यांच्या या चित्रपटात काम करण्याची इच्छा होती. पण प्रथम रणधीर कपूर फिरोज यांच्याशी बोलले कारण हे दोघे एकमेकांचे चांगले मित्र होते. पण या चित्रपटात फिरोज यांना रणधीर नको हवे होते.

त्या काळात मिथुन यांना फिरोज यांच्या चित्रपटात काम करण्याची खूप इच्छा होती, मिथुन आणि अकबर त्या दिवसांमध्ये एकमेकांचे चांगले मित्र होते, यामुळे मिथून यांनी अकबर यांना त्यांचा आगामी सिनेमा 'कुरबानी'साठी आपलं नाव सजेस्ट करण्यास सांगितलं.

1980 पर्यंत मिथुन यांनी बॉलिवूडमध्ये दमदार काम केलं. जेव्हा त्यांनी २० हून अधिक चित्रपट केले होते. तेव्हा त्यांच्या कोणत्याही चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली नव्हती.

त्यानंतर एक दिवस अकबर खान यांनी मिथुन यांना मोठा भाऊ फिरोज खान यांच्या ऑफिसमध्ये नेण्याचं धाडस केलं. मिथुन यांच्या इच्छेबद्दल त्यांनी फिरोज यांना सांगितलं. यानंतर मिथून यांनीही ही फिरोज यांना सांगितली की,  मला या चित्रपटाचा भाग व्हायचा आहे. या दरम्यान, फिरोज मिथुनकडे बघून जोरजोरात हसू लागले.

फिरोज यांनी मिथुन यांचा अपमान केला आणि सांगितलं की, "तू हिरो बनण्यासाठी पात्र नाही, खलनायक बनण्यासाठीही तू पात्र नाहीस." मिथुन यांचा फिरोज यांनी केलेल्या अपमानामुळे ते नाराज झाले आणि काहीही न बोलता तिथून निघून गेले.

मात्र आजतागायत कोणालाही माहिती नाही की, फिरोज असं का बोलले आणि ते असं का वागले मात्र आज मिथुन बॉलिवूडची खूप मोठी आणि नामवंत व्यक्ती आहे.