'झिम्मा 2' चा हाऊसफुल्ल बोर्ड पाहून नेटकऱ्यानं केली विचित्र कमेंट; हेमंत ढोमेनं दिलं चोख उत्तर

Hemant Dhome Trolled: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे 'झिम्मा 2' या चित्रपटाची. त्यातून हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तूफान कमाई करतो आहे. सगळीकडेच हाऊसफूल्लचं बोर्डही लागताना दिसत आहेत. परंतु यावेळी एका ट्रोलरच्या कमेंटनं सगळ्याचे लक्ष्य वेधले असून यावेळी हेमंत ढोमे यानं या कमेंटवर सडेतोड उत्तर दिलं आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Dec 6, 2023, 08:40 PM IST
'झिम्मा 2' चा हाऊसफुल्ल बोर्ड पाहून नेटकऱ्यानं केली विचित्र कमेंट; हेमंत ढोमेनं दिलं चोख उत्तर title=
hemant dhome reacts to troller for trolling him on jhimma 2 housefull baord latest entertainment news in marathi

Hemant Dhome Trolled: सध्या चर्चा आहे ती म्हणजे 'झिम्मा 2' या चित्रपटाची. सध्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली आहे. यावेळी महाराष्ट्रभर या चित्रपटाबाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड लागले आहेत. अशीच एक पोस्ट अभिनेता हेमंत ढोमे यानं शेअर केली होती परंतु या पोस्टखाली एका नेटकऱ्यानं कमेंट करत त्याला ट्रोल केलं आहे. हल्ली मराठी कलाकारांना नेटकऱ्यांनी ट्रोल करणं हे काही नवीन राहिलं नाही. त्यातलंच हे एक उदाहरणं असं म्हणता येईल. 

2021 साली 'झिम्मा'चा पहिला भाग प्रदर्शित झाला होता. पहिल्या 'झिम्मा'नं बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली होती. आता या चित्रपटाचा दुसरा भाग 24 नोव्हेंबर 2023 रोजी प्रदर्शित झाला असून या दुसऱ्या भागावरही प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत. 

एका थिएटरबाहेर 'झिम्मा 2' च्या शोच्या हाऊसफुल्लचा बोर्ड लागला होता. त्याचा फोटो हेमंतनं इन्स्टाग्रामवर शेअर केला. त्याखाली एका नेटकऱ्यानं लिहिलंय की, ''आमच्या इकडे तर एकही काळं कुत्रं जात नाहीये. कसं आणि कुठे चालू आहे हाऊसफुल्ल हे?'' नेटकऱ्याच्या या खोचक कमेंटवर चित्रपटाचा दिग्दर्शक हेमंत ढोमेनं सडेतोड उत्तर दिलं आहे. नेटकऱ्यांच्या या कमेंटवर हेमंत म्हणाला, ''कारण सिनेमा माणसांसाठी बनवलाय! त्यामुळे तुम्हाला तसं वाटत असेल... '' 

नेटकऱ्याच्या या कमेंटला हेमंतच्या चाहत्यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. एकानं लिहिलंय की, ''Animal सोडून मराठी पिक्चरही बघत जा जरा.'' तर दुसऱ्यानं लिहिलंय की, ''व्हा काय उत्तर दिलंय हेमंत सर'' आणि हेमंतला टॅग केलंय.

हेही वाचा : VIDEO: 12 वर्षांपुर्वी शाहरूख खाननं सुहानासाठी व्यक्त केलेली इच्छा अखेर पूर्ण झाली, ऐकून डोळ्यात येईल पाणी

अनेकदा मराठी कलाकारांना त्यांच्या फोटोसाठी ट्रोल केले जाते. अभिनेत्री मिताली मयेकर हिला तिच्या बिकीनी फोटोशूटवरून खूप ट्रोल करण्यात आले होते. त्याचसोबत तिच्या सततच्या परदेशवाऱ्या पाहून 'मालिका आणि चित्रपट नसतानाही एवढे पैसे येतात कुठून' असं म्हणत तिला ट्रोल करण्यात आले होते. त्यावरही तिनं योग्य ते उत्तर दिलं होतं. ज्येष्ठ अभिनेते अविनाश नारकर आणि अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनाही ट्रोल करण्यात येते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

'झिम्मा 2' नं 8 कोटी रूपयांपर्यंत बॉक्स ऑफिसवर कमाई केली आहे. हा आकाडा अजून नक्कीच वाढेल अशी आशा आहे. सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकु राजगुरू, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या अभिनयाचेही सर्वांनीच कौतुक केले आहे. सोबतच या चित्रपटातील 'मराठी पोरी' हे गाणंही तुफान चर्चेत आहे.