कोणी म्हणालं नवीन पॅंट शिवून घे तर कोणी नवी चप्पल घे! हेमांगी कवी ट्रोल; पाहा VIDEO

Hemangi Kavi Trolled: हेमांगी कवी ही सतत कुठल्या ना कुठल्या कारणासाठी चर्चेत असते. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली असते. हेमांगी कवी रिल्सच्या माध्यमातूनही आपल्या प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसते. सध्या तिचा असाच एक रील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. परंतु यावेळी तिला फार मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Jun 15, 2023, 07:08 PM IST
कोणी म्हणालं नवीन पॅंट शिवून घे तर कोणी नवी चप्पल घे! हेमांगी कवी ट्रोल; पाहा VIDEO   title=
June 15, 2023 | Hemangi Kavi gets trolled on wearing same heels and pants while making reels (Photo: Zee News)

Hemangi Kavi Trolled: हेमांगी कवी आपल्या हटके स्टाईलसाठी ओळखली जाते. हेमांगी कवी ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. दोन वर्षांपुर्वी तिच्या 'बाई बुब्स आणि ब्रा' या पोस्टमुळे ती चांगलीच चर्चेत आली होती. सगळीकडेच तिच्या या पोस्टवरून प्रतिक्रिया उमटायला सुरूवात झाली होती. तिच्या या पोस्टनंतर तिची नवी कुठलीही पोस्ट आली की ती कायमच चर्चेत राहते. ती तिचे पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमधील फोटोजही इन्टाग्रामवर शेअर करत असते. त्यामुळे तिचे हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतात. ती इन्टाग्रामवर रील्सही शेअर करताना दिसते. सध्या तिच्या अशाच एक रिलची चर्चा रंगली आहे. परंतु यावेळी ट्रोलर्सनी हेमांगीला सपाटून ट्रोल केलं आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगली आहे. 

नुकतंच अभिनेत्री हेमांगी कवी हिनं अभिनेत्री अश्विनी कासर हिच्यासोबत एक रिल शेअर केला आहे. ज्यात त्या दोघींनी माकेबा या गाण्यावर ताल धरला आहे. यावेळी दोघीही कॅज्युअल वेअरमध्ये दिसल्या होत्या तेव्हा त्या दोघींनी यावर तूफान डान्स केला आहे. यावेळी हेमांगीनं स्लिवलेस टॉप आणि जीन्स परिधान केली होती व त्याखाली शूज घातले होते परंतु यावेळी तिला तिच्या आऊटफिटवरून ट्रोल करण्यात आले आहे. हेमांगी बिधास्तपणे सोशल मीडियावरही वावरताना दिसते. याआधीही तिला अनेकदा ट्रोल करण्यात आलं आहे. खासकरून तिच्या ब्राच्या पोस्टनंतर तर तिला अनेकदा ट्रोल करण्यात आले आहे परंतु हेमांगीनं या ट्रोलर्सना वेळोवेळी चांगलेच उत्तर दिले आहे. यावेळीही तिनं हेटर्सना चांगलाच टोमणा मारला आहे आणि त्यांची बोलतीच बंद केली आहे. 

हेही वाचा - आधी कसा होता आणि आता... कॉमेडियन मनीष पॉलचं थक्क करणारं फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन

त्या दोघींचाही हा डान्स त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. त्याचसोबत हेटर्सनीही आपल्या प्रतिक्रिया मांडल्या आहेत. यावेळी तिच्या कपड्यांवरून तिला ट्रोल करण्यात आले आहे. तिच्या फूटवेअरवरून खासकरून तिला ट्रोल करण्यात आलं आहे. यावेळी तिनं रीलमध्ये एक लूझ डेनिम पॅन्ट घातली आहे. त्यावरूनही एका युझरनं तिच्यावर एक खोचक कमेंट केली आहे. त्या युझरनं लिहिलं आहे की, हेमांगी यांना एक नवी पॅंट शिवून द्यायला हवी तर दुसऱ्या युझरनं म्हटलंय की, तुमचा डान्स फारच छान झाला परंतु आती ती चप्पल बदला कारण प्रत्येक रीलमध्ये फक्त तुमची तीच तीच चप्पल दिसते आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या एका युझरच्या प्रतिक्रियेवर हेमांगीनं आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. ती म्हणाली, हो का, मग तुम्हीच मला एक आणून द्याना. त्यावर या युझरनं प्रतित्युत्तर दिले आणि तो म्हणाला की, ''ओ माय गॉड! माय प्लेजर. मी घेऊन देतो पण तुम्हाला MH23 ला यावं लागेल'' त्यावर हेमांगी म्हणाली की, ''तुम्हाला माझ्या फुटवेअरचा प्रॉब्लेम आहे ना, मग मला वाटतं की तुम्हीच यावं. मी नाही. हेच फुटवेअर पुढचे दहा वर्षं वापरायलाही मी तयार आहे.''