हेमाजींनी धर्मेंद्रना 'अशा' दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचा आज ८२ वा वाढदिवस आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Dec 8, 2017, 03:59 PM IST
हेमाजींनी धर्मेंद्रना 'अशा' दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा! title=

मुंबई : बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचा आज ८२ वा वाढदिवस आहे.

 हेमाजींनी दिल्या शुभेच्छा

त्यानिमित्ताने त्यांची पत्नी आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांनी धर्मेंद्रना शुभेच्छा दिल्या आहेत. हेमाजींनी या प्रसंगी त्या दोघांचे फोटोज शेअर करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. 

काय म्हणाल्या हेमाजी?

त्यांनी ट्वीटमध्ये लिहीले की, "धर्मेंद्रच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांच्यासाठी उत्तम आरोग्य आणि आनंदाची प्रार्थना करते. भगवंतांचा आर्शिवाद कायम राहो. आमचे काही जुने फोटोज."

दोघांबद्दल...

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी ‘बर्निग ट्रेन’, ‘शोले’, ‘नसीब’ आणि ‘ड्रीम गर्ल’ यांसारख्या चित्रपटात एकत्र काम केले आहे. १९७९ मध्ये दोघे विवाहबद्ध झाले. त्यांना ईशा आणि अहाना या दोन मुली आहेत.
सध्या धर्मेंद्र अभिनेते आणि त्यांची मुले सनी देओल-बॉबी देओल सोबत ‘यमला पगला दीवाना : फिर से’च्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. हे दोघे त्यांच्या पहिल्या पत्नीची मुले आहेत.