माझ्या नवऱ्याची बायकोमधील संजनाचा बोल्ड लूक

गुरुनाथ सुभेदार, त्याची बायको राधिका आणि त्याची प्रेयसी शनाया या तीन पात्रांभोवती फिरणारी मालिका माझ्या नवऱ्याची बायको सध्या प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीला उतरलीये.

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Dec 8, 2017, 03:33 PM IST
माझ्या नवऱ्याची बायकोमधील संजनाचा बोल्ड लूक title=

मुंबई : गुरुनाथ सुभेदार, त्याची बायको राधिका आणि त्याची प्रेयसी शनाया या तीन पात्रांभोवती फिरणारी मालिका माझ्या नवऱ्याची बायको सध्या प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीला उतरलीये.

शनायाच्या तावडीतून गुरुनाथची सुटका करण्यासाठी सुरु असलेले राधिकाचे प्रयत्न, या प्रयत्नांमध्ये नेहमी खोडा घालणारी शनाया यांची जुगलबंधी मालिकेत पाहायला मिळतेय. सततच्या ट्विस्ट अँड टर्न्समुळे ही मालिका सध्या टीआरपीमध्ये अव्वल स्थानावर आहे. 

यातच या मालिकेत नव्या पात्राने एंट्री केलीये. संजना असं या नव्या पात्राचं नाव आहे. शनायासारखीच सुंदर, बोल्ड अशी ही संजना मालिकेत आल्याने मालिकेला नवे वळण मिळालेय. गॅरीच्या मनात संजना आपली जागा निर्माण करणार नाही ना अशी भिती आता शनायाला वाटतेय. तर दुसरीकडे राधिकाने आपला लूक पूर्णपणे बदललाय. 

मालिकेत दाखवल्याप्रमाणेच संजना खऱ्या आयुष्यातही तितकीच बिनधास्त आहे. अभिनेत्री मिरा जग्ननाथ संजनाची भूमिका साकारतेय. पाहा मिराचे बोल्ड फोटोज(सौजन्य - फेसबुक)