मुंबई : शाहरूख खान कायमच आपल्या मुलासोबत एक स्पेशल बॉन्ड शेअर करतो. तो कायमच आपल्या कुटुंबाची काळजी करतो. व्यस्त शेड्युलमधून अनेकदा वेळ काढून कुटुंबासोबत राहतो. २०२१ हे वर्ष मात्र शाहरूखसाठी खूप चॅलेंजिंग होतं. आर्यन खान ड्रग्स प्रकरणात त्याला काही दिवस तणावात गेले. आर्यन कारागृहातून बाहेर आल्यावर त्याने कुटुंबाच्याबाबतीत अनेक महत्वाचे निर्णय घेतले. आर्यन हा कायमच शाहरूखसाठी खास राहिला आहे.
आर्यनच्या जन्मावेळी शाहरूख म्हणाला, मुलगा नाही तर माझा मित्र जन्माला आलाय. अनेकदा शाहरूख खान आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवतो. आयपीएलच्या टीम कोलकाता नाइट रायडर्सला सपोर्ट करताना तो मुलांसोबत दिसला.
आर्यन खानचा जन्म १९९७ साली झाला. यावेळी शाहरूखचा आनंद गगनात मावत नव्हता. त्याने एका मुलाखतीत या आठवणींना उजाळा दिला आहे. आर्यन माझा मुलगा नाही तर माझा मित्र आहे.
शाहरुख खानचा मुलगा आर्यनसोबत खास बॉन्ड आहे. तो नेहमीच आपल्या कुटुंबाची काळजी घेतो. मुलाच्या जन्मानंतर अभिनेता शाहरुख खानने अमेरिकेतील एका टीव्ही चॅनलला मुलाखत दिली. यामध्ये मुलाखतकार शाहरुखचे वडील झाल्याबद्दल अभिनंदन करतो आणि त्यानंतर त्याच्या भावना व्यक्त करताना म्हटलं की, 'माझ्या मुलाचा नाही तर मित्राचा जन्म झाला आहे.'
आर्यन खानचा जन्म झाला तोपर्यंत शाहरुख खान एक यशस्वी स्टार बनला होता. त्याचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. पर्सनल लाइफ आणि प्रोफेशनल लाइफमध्ये तो खूप छान समन्वय साधत होता. आता आर्यन खान २४ वर्षांचा आहे तर सुहाना खान २१ वर्षांची.