'गो गोवा गॉन' म्हणत लोकप्रिय सेलिब्रिटी लग्नाच्या बेडीत; पाहा Romantic Video

इथं त्याच्या लग्नाचीच बातमी धडकली... पाहा Photo   

Updated: Jan 18, 2022, 10:08 AM IST
'गो गोवा गॉन' म्हणत लोकप्रिय सेलिब्रिटी लग्नाच्या बेडीत; पाहा Romantic Video  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

पणजी : कोरोना काळात औषधं आणि आजारपणाच्या ट्रेंडसोबत आणखी एका ट्रेंडनं सर्वांचं लक्ष वेधलं. मुख्य म्हणजे या ट्रेंडनं कोणाची चिंता वाढवली नाही.

हो चिंता वाढवली असेल तरीही ती अविवाहितांची, ज्यांना वारंवार लग्नाच्या प्रश्नानं हैराण केलं जातं. कारण हा ट्रेंड होता लग्न करण्याचा. होता म्हणण्यापेक्षा आहे म्हणावं लागेल. कारण अद्यापही हा ट्रेंड सुरुच आहे. (Wedding)

एका लोकप्रिय चेहऱ्यानं थेट गोव्यात जात तिथल्या निवांत वातावरणात लग्नगाठ बांधत सहजीवनाच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. 

ट्रेसी घरी आलीये.... असं म्हणत आपल्या पत्नीचं अनोख्या अंदाजात स्वागत करणारा हा सेलिब्रिटी आहे स्टँडअप कॉमेडियन केनी सबॅस्टियन. 

केनी, म्हणजेच केनेथ सबॅस्टियन आणि त्याची प्रेयसी ट्रेसी अॅलिसन आंचा विवाह नुकताच पार पडला. 

काही मित्रमंडळी आणि कुटुंबीयांची या सोहळ्यासाठी हजेरी पाहायला मिळाली. सोशल मीडियावरही या विवाहसोहळ्याचे फोटो आणि काही रोमँटिक व्हिडीओ शेअर करण्यात आले. 

केनी हा गाजलेला स्टँडअप कॉमेडियन आहे. तर, ट्रेसी ही एक डेंटिस्ट अर्थात दंतचिकित्सक असल्याचं कळत आहे. तिच्या इन्स्टा बायोतून ही माहिती मिळत आहे. 

लग्नासाठी या दोघांनीही पारंपरिक ख्रिस्त धर्म पद्धतीनुसार सुट आणि गाऊन अशा वेषाला पसंती दिली होती. 

तर, त्यांचा शेरवानी आणि लेहंगा लूकमधील फोटोही कमाल व्हायरल होत आहे. 

काही फॅनपेजेसवरून त्यांचा लग्नातील परफॉर्मन्सचा व्हिडीओही पोस्ट करण्यात आला आहे. जिथं ही दोघंही या क्षणांचा आनंद घेताना दिसत आहेत.