रात्री उशिरा Cousin सोबत 'अॅडल्ट फिल्म' पाहत होता विक्रांत मेस्सी, मावशी खोलीत येताच...

अॅडल्ट फिल्म पाहत होते आणि त्याचवेळी मावशी खोलीत आली होती. 

Updated: Jul 3, 2021, 11:32 AM IST
रात्री उशिरा Cousin सोबत 'अॅडल्ट फिल्म' पाहत होता विक्रांत मेस्सी, मावशी खोलीत येताच...  title=
हसीन दिलरुबा

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सी, हर्षवर्धन राणे आणि तापसी पन्नू सध्या त्यांच्या 'हसीन दिलरुबा' या चित्रपटामुळं चर्चेत आले आहेत. याच चित्रपटाच्या निमित्तानं विविध मुलाखतींमध्ये ही मंडळी त्यांच्या जीवनाशी संबंधित काही रंजक गोष्टींचाही उलगडा करत आहेत. अशाच एका मुलाखतीत एका प्रश्नाचं उत्तर देत या तिघांनीही चाहत्यांच्या नजरा वळवल्या आहेत. 

आरजे सिद्धार्थ कन्नन यानं या कलाकारांना तुम्हाला कधी कुणी 'चुकीचं' काही पाहताना पकडलं आहे का, असा प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना, विक्रांत मेस्सी यानं एक किस्सा सांगितला. 

ही घटना तेव्हाची आहे, ज्यावेळी तो त्याच्या आजीच्या घरी होता. तेव्हा तो आणि त्याचा भाऊ (Cousin) अॅडल्ट फिल्म पाहत होते आणि त्याचवेळी मावशी खोलीत आली होती. रात्रीच्या तीन वाजता मावशीला जाग येईल याची आपल्याला पुसटशी कल्पनाही नव्हती. पण, त्यांना जाग आली आणि, आम्हाला त्यावेळी फारच खजिल झाल्यासारखं वाटलं. त्यावेळी विक्रांत त्याच्या मावशीकडे काही दिवस राहण्यासाठी गेला होता. 

Taapsee Pannu : वडिलांसोबत 'बोल्ड सीन' पाहताना काय व्हायची तापसी पन्नूची अवस्था?

सतत संकोचलेपणा वाटू लागला... 

मावशीच्या घरी घडलेल्या त्या घटनेनंतर विक्रांतला मावशीच्या घरी कोणत्याही कामासाठी जाताना संकोचलेपणा वाटू लागला होता. मावशीची आदरयुक्त भीती असल्यामुळं तिच्या नजरेस नजर मिळवणंही विक्रांतला कठीण झालं होतं. असं होऊनही त्याच्या मावशीनं कधीही विक्रांतच्या आईकडे या गोष्टीची वाच्यता केली नव्हती. मुलं मोठी होत आहेत, ही बाब लक्षात घेत मावशीनं ही बाब कधीच कोणासमोरही उघज केली नव्हती.