VIDEO : 'काला चष्मा...' या गाण्यावर सपना चौधरीचा खास ठेका...

पाहा हा व्हिडिओ

VIDEO : 'काला चष्मा...' या गाण्यावर सपना चौधरीचा खास ठेका...  title=

मुंबई : हरियाणातील सुपरहिट डान्सर सपना चौधरी दिवसेंदिवस लोकप्रिय होताना दिसत आहे. आपल्या देसी हरियाणवी अंदाजामुळे सपना चौधरीने लाखो फॅन्सना वेड करून टाकलं आहे. मात्र आता हीच सपना चौधरी बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका धरताना दिसत आहे. या अगोदर सपना चौधरीला अशा स्वरूपात कुणी पाहिलं नाही. 'तेरी आंख्या का काजल... ' या गाण्यातून लोकप्रिय झालेली सपना चौधरी बॉलिवूड गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. 

बिग बॉसच्या घरातून निघालेल्या या सपना चौधरीने बॉलिवूड ते भोजपुरी सिनेमात प्रवेश केला. तसेच ती काही व्हिडिओत देखील दिसत आहे. आता सपना चौधरी वेस्टर्न डान्समध्ये दिसत आहे. सपना चौधरी या व्हिडिओ 'हम्मा हम्मा' ते 'काला चष्मा' सारख्या गाण्यांवर डान्स करत आहे. पाहा हा हटके अंदाज  

पाहा हा अफलातून व्हिडिओ