हॅप्पी बर्थडे : 'देवदास'साठी दिग्दर्शकाची पहिली पंसत बनली गायिका

बॉलीवूडची आघाडीची गायिक श्रेया घोसाल हिचा आज वाढदिवस. १२ मार्च १९८४ ला तिचा जन्म झाला. आज ती आपला ३४ वा वाढदिवस साजरा करतेय.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Mar 12, 2018, 10:11 AM IST
हॅप्पी बर्थडे : 'देवदास'साठी दिग्दर्शकाची पहिली पंसत बनली गायिका  title=

मुंबई : बॉलीवूडची आघाडीची गायिक श्रेया घोसाल हिचा आज वाढदिवस. १२ मार्च १९८४ ला तिचा जन्म झाला. आज ती आपला ३४ वा वाढदिवस साजरा करतेय.

श्रेयाने आतापर्यंत ४ नॅशनल अॅवॉर्ड आणि ६ फिल्मफेयर अॅवॉर्ड आपल्यानावे केले.

'डोला रे डोला'सुपरहिट 

२०१५ साली श्रेयाने लहानपणीचा मित्र शिलादित्य मुखोपाध्यायसोबत लग्न केलं. रिकाम्या वेळात तिला फिरायला आणि पुस्तक वाचायला आवडतं. श्रेयाला पहिल्यांदा दिग्दर्शक संजय लिला भन्सालीने टीव्हीवर पाहिल्यानंतर देवदास सिनेमातील गाण्यासाठी निवडले. 

श्रेयाने गायलेले 'डोला रे डोला' गाणं खूप गाजलं. त्यानंतर श्रेयाने खूप सुपरहिट गाणी दिली. लहानपणापासूनच तिला संगिताची आवड होती. १० वर्षाची असताना ती 'सारेगामापा'ची विनर ठरली. 

यशस्वी गायक 

श्रेयाने देवदास सिनेमासाठी आपल्या बॉलीवूड करियरमधील पहिलं गाणं गायल.  ऐश्वर्याच्या 'पारो'ची सर्व गाणी श्रेयाने गायली आहेत. श्रेया सध्या बॉलीवूडच्या यशस्वी गायकांपैकी एक आहे.