हंसिका मोटवानी आणि पतीमध्ये लग्नाच्या दोन दिवसानंतरच दुरावा

Hansika Motwani Wedding: लग्नाच्या दोन दिवसांनंतरच अभिनेत्री पतीपासून लांब जाणार आहे. 

Updated: Dec 6, 2022, 12:13 PM IST
हंसिका मोटवानी आणि पतीमध्ये लग्नाच्या दोन दिवसानंतरच दुरावा title=

Hansika Motwani Honeymoon: हंसिका मोटवानी (Hansika Motwani) हिने बॉलिवूडसह तमिळ आणि तेलगू चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. अभिनेत्री हंसिका मोटवानी तिचा बिझनेसमन बॉयफ्रेंड सोहेल कथुरियासोबत (Sohail Kathuria) 5 डिसेंबर 2022 रोजी जयपूरमध्ये लग्नगाठ बांधली आहे.  ज्याचे आतले फोटो समोर आले आहेत. या अभिनेत्रीने राजस्थानमधील जयपूर येथील 450 वर्षे जुन्या मुंडोटा फोर्ट आणि पॅलेसमध्ये लग्नाचं सगळे सोहळे पार पाडले. दरम्यान, हंसिकाच्या हनीमूनबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे.

सोहेलसोबत लग्ना केल्यानंतर दोघांमध्ये येणार अंतर
रिपोर्ट्सनुसार, हंसिका मोटवानीने तिच्या कामातून बराच मोठा ब्रेक घेतला आहे. अभिनेत्रीला तिच्या पतीसोबत क्वालिटी टाईम स्पेंण्ड करत आहे. डेस्टिनेशन वेडिंगनंतर या जोडप्याने त्यांच्या हॅप्पी हनीमूनसाठी खास प्लॅन्सही आखले आहेत. पण आता हंसिका, सोहेलसोबत लग्नगाठ बांधल्यानंतर ती थेट शूटिंग मोडमध्ये येणार असल्याची बातमी आहे.

रिपोर्टनुसार, लग्नाच्या दोन दिवसांनंतरच अभिनेत्री पतीपासून लांब जाणार आहे. दोघांनीही हनिमूनचा प्लॅन केला असला तरी हनिमूनला  जाण्यापूर्वी हंसिकाला काही काम पूर्ण करायची आहेत.  अभिनेत्री 6 डिसेंबरलाच कामावर परतणार आहे. लग्नानंतर दोन दिवसांनी हंसिका एका ब्रँड शूटच्या शूटिंगमध्ये व्यस्त असेल.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पेडिंग काम संपवून हनीमूनला जाणार हंसिका 
 नवविवाहित हंसिका आणि सोहेल यांनी त्यांच्या हनीमूनसाठी अतिशय रोमँटिक ठिकाण निवडलं आहे. दोघंही डिसेंबरच्या शेवटी हनिमूनला जातील. अशा परिस्थितीत हंसिकाच्या सुट्टीचा ब्रेक महिन्याच्या अखेरीस सुरू होणार आहे त्यामुळे लग्नानंतरची उर्वरित कामं पूर्ण करूनच अभिनेत्री हनिमूनला रवाना होणार आहे. हे जोडपं हनिमूनला न्यू ईयर सेलिब्रेट करणार आहे.