बॉलिवूडची अभिनेत्री कॅन्सर विळख्यात, भावुक होत सांगितल्या वेदना

असे अनेक आजार आहेत ज्याबद्दल जाणून घेतल्यावर खूप भिती वाटते. 

Updated: Dec 20, 2021, 08:38 PM IST
बॉलिवूडची अभिनेत्री कॅन्सर विळख्यात, भावुक होत सांगितल्या वेदना title=

मुंबई : असे अनेक आजार आहेत ज्याबद्दल जाणून घेतल्यावर खूप भिती वाटते. असाच एक आजार म्हणजे कर्करोग. बॉलीवूडमधील अनेक स्टार्सदेखील कर्करोगामुळे या वेदनातून गेले आहेत. अनेक स्टार्सनी या आजारावर मात करून जीवनाची लढाई जिंकली असली तरी. या यादीत आणखी एका अभिनेत्रीच्या नावाचा समावेश झाला आहे. हमसा नंदिनी असं या अभिनेत्रीचं नाव असून ती ब्रेस्ट कॅन्सरने त्रस्त आहे. हमसाने केमोथेरपीदरम्यान तिला पडलेलं टक्कल  लूकचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करून एक संदेशदेखील दिला आहे.

हमसा कॅन्सरने त्रस्त 
हमसा कर्करोगाने ग्रस्त असून ती तिसऱ्या टप्प्यात आहे. नुकतंच तिने सोशल मीडियावर आपणं कॅन्सरग्रस्त असल्याची माहिती दिली. अभिनेत्रीच्या या खुलाशानंतर चाहत्यांना धक्का बसला आहे. कारण काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने तिच्या 37 व्या वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

अभिनेत्रीने एक मोठी पोस्ट लिहिली
हमसा नंदिनीने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की,  '4 महिन्यांआधी स्तनावर थोडीशी गाठ जाणवली. त्याचवेळी मला समजलं की, आता माझं आयुष्य पूर्वीसारखं राहणार नाही. 18 वर्षांपूर्वी मी माझी आई  स्तनाच्या कर्करोगामुळे गमावली. जसं मला या गाठीविषयी समजलं तसं मी लगेच डॉक्टरांना भेटले. मग बायोस्पी केली आणि मला ब्रेस्ट कॅन्सर असल्याचं कळलं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आत्तापर्यंत माझ्या 9 केमोथेरपी झाल्या आहेत आणि अजून 7 करायच्या आहेत. या आजाराचा सामना करताना मी हार मानणार नाही. असं मी स्वतःला वचन दिलं आहे. यासह, चेहऱ्यावर मोठे हास्य आणि विजयाचा आत्मविश्वास घेऊन मी लढणार आहे. अभिनेत्रीने पुढे लिहिलं, 'मला माझी गोष्ट सर्वांना सांगायची आहे जेणेकरून मी इतरांना प्रेरित करू शकेन.' अभिनेत्रीची ही पोस्ट पाहिल्यानंतर तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.