51 वर्षाच्या अभिनेत्रीचे सुंदर काळे केस, काय आहे रहस्य?

प्रसिद्ध अभिनेत्री ५१ वर्षांची असूनही आजही तेवढीच सुंदर दिसते

Updated: Dec 20, 2021, 08:09 PM IST
51 वर्षाच्या अभिनेत्रीचे सुंदर काळे केस, काय आहे रहस्य? title=

मुंबई : 'मैने प्यार किया' सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री ५१ वर्षांची असूनही आजही तेवढ्याच सुंदर दिसतात. त्या स्वत:च्या त्वचेची आणि केसांची खूप चांगली काळजी घेतात.  त्यामुळे आज ही एवढं वय असूनही त्या खूप सुंदर दिसतात. भाग्यश्री सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत आणि त्यांच्या चाहत्यांना चांगल्या टिप्स देखील शेअर करतात. असाच एक व्हिडिओ भाग्यश्री यांनी सोशल मीडियावर शेअर केलाय. या व्हिडिओत ते आपल्या केसांचं रहस्य शेअर करताना दिसत आहेत.

नुकतंच त्यांनी त्यांच्या काळ्या आणि दाट केसांचं रहस्य इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलं आहे. भाग्यश्री यांनी या व्हिडिओमध्ये हेअर पॅक बनवण्याची पद्धत शेअर केली आहे. तुम्हालाही त्यांच्यासारखे केस हवे असतील तर त्यांनी सांगितलेल्या या टिप्स नक्की फॉलो करा. चला जाणून घेऊया हेअर पॅक कसा बनवायचा 

मेथी आणि कोको हेअर पॅक घरी कसा तयार करायचा

साहित्य
नारळाचं दूध - 1 कप,  मेथी दाणे 1 कप, केसांच्या लांबीनुसार तुम्ही हे घटक कमी-अधिक प्रमाणात घेऊ शकता.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेअर पॅक कसा बनवायचा
सर्वप्रथम मेथीचे दाणे घ्या आणि रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी त्यातील पाणी काढून मिक्सरमध्ये चांगलं वाटून घ्या. आता त्यात नारळाचे दूध टाकून स्मूद पेस्ट तयार करा. या पेस्टने केसांना मसाज करा आणि सुमारे 40 मिनिटे ठेवा. नंतर शॅम्पूने स्वच्छ धुवून घ्या.