Guess Who : आजीच्या मांडीवर बसलेल्या 'या' स्टार अभिनेत्रीला ओळखलंत का?

नुकतीच आई बनलीय...वडील अजूनही चित्रपटात सक्रिय आहेत, कोण आहे ही बॉलिवूड अभिनेत्री?

Updated: Sep 27, 2022, 07:02 PM IST
Guess Who : आजीच्या मांडीवर बसलेल्या 'या' स्टार अभिनेत्रीला ओळखलंत का?  title=

मुंबई : सोशल मीडियावर (Social media) अनेक फोटो व्हायरल (Photo viral) होत असतात. या फोटोत स्टार्सचे प्रौढ अवस्थातले आणि लहाणपणीचे फोटो व्हायरल होत असतात. असाच एक स्टार अभिनेत्रीचा (Actress) लहानपणीचा फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून तुम्हाला ही अभिनेत्री ओळखायची आहे.  

फोटोत काय?
फोटोत एक आजी आणि लहानगी मुलगी दिसत आहे. ही मुलगी बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री (Bollywood Actress)  आहे. तर या अभिनेत्रीची ही आज्जी आहे. अभिनेत्रीचा हा लहाणपणीचा फोटो आहे. हा फोटो पाहून तिला ओळखणे खुपच अवघड आहे. मात्र आम्ही तुम्हाला या अभिनेत्री बाबत काही हिंट देणार आहोत, जेणेकरून तुम्ही या अभिनेत्रीला ओळखू शकाल.  

कोण आहे ही अभिनेत्री?
बॉलिवूडची ही एक प्रसिद्ध अभिनेत्री (Bollywood Actress)  आहे. बॉलिवूडच्या (Bollywood)  अनेक चित्रपटात तिने काम केले आहे. तिचे वडिल बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते आहेत. आजही ते बॉलिवूडच्या अनेक चित्रपटात दिसतात. बाप-लेक दोघेही बॉलिवूडमध्ये चांगले सक्रिय आहेत. तुम्हाला आता या अभिनेत्रीची ओळख पटलीच असेल. 

'ही' आहे अभिनेत्री? 
जर तुम्ही अजूनही या अभिनेत्रीला ओळखू शकला नसाल तर आम्ही तुम्हासा सांगतो की ही अभिनेत्री बॉलिवूडची (Bollywood Actress) प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूर आहे. तिला बॉलिवूडची फॅशन दिवा देखील म्हटले जाते. तिचे वडील अनिल कपूर या वयात देखील सिनेमात दिसतात. या बाप-लेकीच्या जोडीने बॉलिवूडमध्ये अनेक सिनेमे दिले आहेत. 

दरम्यान नुकतीच सोनम कपूर आई झाली आहे. तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. सध्या ती मातृत्वाचा आनंद घेत आहे.