मुंबई : बॉलीवूड इंडस्ट्रीत संघर्षांची कहाणी अनेकदा ऐकायला मिळते. इथे करिअर बनवण्यापासून ते वैयक्तिक संबंधांपर्यंत सर्वत्र संघर्ष दिसतो. अलीकडेच एका दिग्गज अभिनेत्रीने तिच्या नात्याबद्दल स्ट्रगलची कहाणी सांगितली आहे. या अभिनेत्रीला स्ट्रॉंग वुमन आणि सिंगल मदर म्हणून ओळखलं जातं.
ही ताकद गाठणं त्यांच्यासाठी सोपी नव्हती. आम्ही बोलत आहोत अभिनेत्री नीना गुप्ता यांच्याबद्दल. लग्नाशिवाय मुलगी मसाबा गुप्ताला जन्म देणं आणि वाढवणं या संघर्षाच्या वेदना तिने कथन केल्या आहेत.
दिलेल्या एका मुलाखतीत नीना गुप्ता यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलेपणाने सांगितलं आणि अनेक गुपितंही उघड केली. त्या म्हणाल्या, 'आयुष्यात झालेली चूक सुधारण्याची संधी मिळाली असती तर मला लग्नाशिवाय कधीच आई होण्याची इच्छा झाली नसती.' त्या पुढे म्हणाल्या, 'प्रत्येक मुलाला दोन्ही पालकांची गरज असते. मी नेहमीच मसाबासोबत सर्व काही प्रामाणिकपणे शेअर करत असते. त्यामुळे आमच्या नात्यावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. पण तिनेही संघर्ष केला आहे.
नीना गुप्ता 1980 च्या दशकात वेस्ट इंडिजचा क्रिकेटर विवियन रिचर्ड्ससोबतच्या रिलेशनशिपमुळे प्रचंड चर्चेत आली होती. विवियन रिचर्ड्ससोबत तिने मुलगी मसाबा गुप्तालाही जन्म दिला. नीना आणि विवियन यांनी कधीही लग्न केलं नाही. नीनाने आपल्या मुलीला सिंगल मदर म्हणून एकट्याने वाढवलं. आज मसाबा गुप्ता एक प्रसिद्ध फॅशन डिझायनर आणि फिल्म इंडस्ट्रीतील एक मोठं नाव आहे.
त्याचवेळी, 60 वर्षीय नीना गुप्ता आता त्यांच्या सेकेंड इनिंगचा जोरदार आनंद घेत आहे. त्यांना 2018 मध्ये 'बधाई हो' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला आहे. खुद्द नीनाही या पुरस्काराने आश्चर्यचकित झाल्या होत्या.