गोविंदाचं 'या' अभिनेत्रीवर होतं क्रश, विवाहीत असूनही तिच्या सौंदर्यानं लावलं होतं वेड

Govinda Had Crush On This Actress : गोविंदानं एका मुलाखतीत त्याला अभिनेत्रीवर असलेल्या क्रशविषयी सांगितलं आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Apr 8, 2024, 05:10 PM IST
गोविंदाचं 'या' अभिनेत्रीवर होतं क्रश, विवाहीत असूनही तिच्या सौंदर्यानं लावलं होतं वेड title=
(Photo Credit : Social Media)

Govinda Had Crush On This Actress : दिवंगत अभिनेत्री दिव्या भारती ही त्यांच्याकाळातील लोकप्रिय कलाकारांपैकी एक होती. दिव्या भारतीला तिच्या सुंदरतेसाठी सगळेच ओळखतात. तिला पाहिलं की कोणीही तिच्या प्रेमात पडायचं. त्यापैकी एक अभिनेता गोविंदा आहे. गोविंदानं एका मुलाखतीत दिव्या विषयी असलेल्या त्याच्या भावनांविषयी स्पष्टपणे सांगितलं आहे. यावेळी लग्न झाल्यानंतर गोविंदाला दिव्या भारतीवर क्रश होतं, असा खुलासा त्यानं यावेळी केला. 

गोविंदानं ही मुलाखत स्टारडस्टला दिली होती. यावेळी त्यानं दिव्या भारतीचं सौंदर्याविषयी सांगत जूही आणि दिव्या भारतीवर क्रश असल्याचं सांगितलं. गोविंदानं त्यावेळी हा विचार केला नाही की त्याच्या या वक्तव्यानं पत्नी सुनीताला राग येऊ शकतो. तो थेट बोलून गेला की दिव्या भारतीच्या सौंदर्यात तो अडकलाय. 90 च्या दशकात गोविंदाचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडण्यात आलं. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत दिव्या भारतीसोबत नात्याच्या चर्चांवर आणि दुसऱ्या लग्नावर वक्तव्य केलं. 

दिव्या भारतीला साजिद नाडियाडवालाशी भेटवण्यासाठी गोविंदाची महत्त्वाची भूमिका होती. त्यांची पहिली भेट ही 'शोला और शबनम' च्या शूटिंग दरम्यान, झाली होती. दिव्याला गोविंदासोबत कास्ट करण्यात आलं होतं. तर साजिद हे 'जुल्म की हुकूमत' साठी गोविंदासोबत काम करत होते. याच चित्रपटामुळे ते गोविंदाच्या माध्यमातून दिव्याला भेटले आणि तिच्या सुंदरतेनं त्यांनाही वेड लावलं. सुरुवातीला ते मित्र होते त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात वेडे झाले. मग काय 10 मे 1992 मध्ये त्यांचं लग्न झालं. 

हेही वाचा : 'त्यानं जबरदस्ती माझ्या छातीवर...,' मराठमोळ्या अभिनेत्रीनं केला कास्टिंग काऊचचा खुलासा

दरम्यान, लग्नाला एक वर्ष पूर्ण होण्या आधीच दिव्याचे निधन झाले. 5 एप्रिल 1993 मध्ये दिव्या तिच्या अपार्टमेंटमधून खाली पडली आणि वयाच्या 19 व्या वर्षी तिनं अखेरचा श्वास घेतला. तिच्या निधनाच्या बातमीनं सगळ्यांना मोठा धक्का बसला होता. तिचं निधन कसं झालं त्या मागचं सत्य हे अजूनही कोणाला माहित नाही. तर दिव्याच्या निधनानंतर साजिद यांना इतका मोठा धक्का बसला होता की अनेकवर्ष ते एकटे होते. त्यांनी त्यांचे सगळे चित्रपट दिव्या भारतीला डेटिकेट केले. तर पत्रकार वर्दा  खान यांच्याशी लग्न करण्या आधीपर्यंतचे हे सगळे चित्रपट होते. एका मुलाखतीत वर्दा यांनी खुलासा केला होता की साजिद आजही त्यांच्या पर्समध्ये दिव्या यांचे फोटो ठेवतात.