9 महिन्यांचा झाला 'गोला', भारती सिंहने शेअर केले लेकाचे लेटेस्ट फोटो

भारती सिंग तिच्या उत्तम विनोदी कौशल्यांसाठी नेहमीच चर्चेत असते. 

Updated: Jan 4, 2023, 07:44 PM IST
9 महिन्यांचा झाला 'गोला', भारती सिंहने शेअर केले लेकाचे लेटेस्ट फोटो title=

मुंबई : कॉमेडियन भारती सिंग काहि महिन्यांपुर्वी आई झाली आहे. तिने पती हर्ष लिंबाचियासोबत मुलाचे स्वागत केलं. 1 एप्रिलला भारती सिंगला मुलगी झाल्याची बातमी सोशल मीडियावर चर्चेत होती. ज्यानंतर भारतीने ही अफवा असल्याचे सांगत चर्चांना पूर्णविराम दिला होता. मात्र भारतीने 4 एप्रिल २०२२ ला एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. भारतीने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना आई बनल्याची माहिती दिली होती.

भारती सिंग तिच्या उत्तम विनोदी कौशल्यांसाठी नेहमीच चर्चेत असते. पण, जेव्हापासून तिचा लहान मुलगा गोला तिच्या घरी आला तेव्हापासून त्याच्या प्रसिद्धीच्या झोतात येण्या मागचं कारणही बदललं आहे. आता नेहमी गोलामुळे चर्चेत असते.

अलीकडेच भारती सिंहने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर तिच्या बाळाचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात गोलाच्या गोंडसपणाने सर्वजण त्याच्या फोटोंवर फिदा झाले आहेत. या फोटोमध्ये भारती गोलाला आपल्या मांडीवर घेतलेली दिसत आहे.  3 जानेवारी 2023 रोजी गोला 9 महिन्यांचा झाला आहे. नुकतेच भारतीने त्याचा 9वा वाढदिवस साजरा करण्यासाठी कधीही न पाहिलेले फोटो शेअर केले आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

फोटोंमध्ये भारती पांढऱ्या रंगाच्या मॅक्सी ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. आणि त्याचा मुलगा गोलाला पांढऱ्या स्वेडलमध्ये गुंडाळलेलं दिसत आहे. गोलाच्या वडिलांनीही पांढऱ्या रंगाचा पोशाख कॅरी केला आहे. तर एका फोटोमध्ये लक्ष्य गिटार हातात धरलेलं दिसत आहे. खुर्चीवर झोपलेला लक्ष्य खूपच गोंडस आणि निरागस दिसत आहे.

डोळे मिटलेला छोटा गोला चाहत्यांची मने जिंकत आहेत. गोलाचे हे फोटो सध्या चाहत्यांची मने जिंकत आहे. अवघ्या काहीच वेळात हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. चाहत्यांनी या फोटोवर लाईक्स कमेंट्सचा वर्षाव केला आहे.