न्यूड फोटो प्रकरणी मिलिंद सोमणविरोधात गुन्हा दाखल

अभिनेता आणि फिटनेस प्रमोटर मिलिंद सोमणविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ४ नोव्हेंबरला मिलिंद सोमणनं वाढदिवसानिमित्त समुद्रावर नग्नावस्थेत धावतानाचा फोटो प्रसिद्ध केला होता. 

Updated: Nov 7, 2020, 10:19 AM IST
न्यूड फोटो प्रकरणी मिलिंद सोमणविरोधात गुन्हा दाखल   title=

मुंबई : अभिनेता आणि फिटनेस प्रमोटर मिलिंद सोमणविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ४ नोव्हेंबरला मिलिंद सोमणनं वाढदिवसानिमित्त समुद्रावर नग्नावस्थेत धावतानाचा फोटो प्रसिद्ध केला होता. गोव्याच्या समुद्र किनारी हा फोटो काढला होता.. त्यामुळे त्याच्यावर अश्लील कृत्य आणि गाणी तसंच इलेक्ट्रॉनिक स्वरुपात अश्लील सामग्री प्रकाशित करण्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलाय.फिटनेसबद्दल मिलिंद सोमण कायमच सगळ्यांना प्रेरणा देत असतो. यावेळी त्याने एक पाऊल पुढे होऊन समुद्र किनारी धावणारा फोटो शेअर केला आहे. पण या फोटोत तो Naked Run करत आहेत. त्याचा हा फोटो त्याची पत्नी अंकिता कोनवरने क्लिक केला आहे. पण हाच फोटो आता वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Happy birthday to me ! . . . #55  @ankita_earthy

A post shared by Milind Usha Soman (@milindrunning) on

हॅप्पी बर्थ डे टू मी म्हणत #55 असं म्हणतं मिलिंद सोमणने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे. तसेच फोटो क्रेडिट अंकिताला दिलं आहे.

दरम्यान, पूनम पांडे ही सप्टेंबर महिन्यात गोव्यात गेली होती. तिथे तिने धरणावर फोटो शूट केले होते. या वादग्रस्त फोटो शूट प्रकरणात पोलिसांनी कारवाई केली आहे. गोव्यातील धरणावर आक्षेपार्ह चित्रिकरण केल्याने  मॉडेल पूनम पांडेला गोवा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

५५ व्या वाढदिवशी मिलिंद सोमणने शेअर केला न्यूड फोटो

पूनमला जामीन 

न्यूड फोटो शूट : मॉडेल पूनम पांडे हिला गोव्यात अटक

बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेला (Poonam Pandey) 'त्या' व्हिडिओ शूट केल्याप्रकरणी जामीन मिळाला आहे. या प्रकरणी पूनम पांडेला २० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मिळाला आहे.  पूनम पांडे आणि तिच्या नवऱ्याला सॅम बॉम्बे यांना गोवा पोलिसांनी चापोली धरणावर आक्षेपार्ह व्हिडिओ शूट केल्याप्रकरणी अटक केली होती. 

पूनम पांडेला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. व्हिडीओच्या चित्रिकरणादरम्यान पूनम पांडे हिच्याजवळ उभ्या असलेल्या दोन पोलीस कर्मचार्‍यांनाही निलंबित करण्यात आले आहे. कॅनकोना पोलिसांनी पूनमला अगौदा येथील रिसॉर्टमधून अटक केली आहे. या प्रकरणात अश्लील फोटो शूट करणार्‍या अज्ञात व्यक्तीवरही गुन्हा दाखल आहे.