बिग बॉसमधील प्रियांकवर त्याच्या गर्लफ्रेंडने केले गंभीर आरोप

बिग बॉस हाऊसमध्ये चांगलाच ड्रामा रंगत आहे. बिग बॉसच्या घरात भांडणी सुरु आहेत. तर दुसरीकडे भरपूर प्रेम देखील काही जणांमध्ये दिसत आहे.

Updated: Nov 19, 2017, 04:50 PM IST
बिग बॉसमधील प्रियांकवर त्याच्या गर्लफ्रेंडने केले गंभीर आरोप title=

मुंबई : बिग बॉस हाऊसमध्ये चांगलाच ड्रामा रंगत आहे. बिग बॉसच्या घरात भांडणी सुरु आहेत. तर दुसरीकडे भरपूर प्रेम देखील काही जणांमध्ये दिसत आहे.

पुनीष आणि बंदगी यांच्यात उघडपणे प्रेम दिसत असतांनाच आता प्रियांक आणि बेनाफ्शा यांच्यात लपून छपून प्रेम वाढतंय. दोघांमधली येवढी जवळीकता पाहताच दोघांचे पार्टनर त्यांच्यापासून वेगळे झाले आहेत. प्रियांकच्या गर्लफ्रेंडने त्याच्यापासून ब्रेकअप केलं आहे.

प्रियांकची गर्लफ्रेंड दिव्याने एका मुलाखतीत म्हटलं की, 'प्रियांकला प्रत्येक शोमध्ये एंटरटेन करण्यासाठी मुलगी हवी असते. मी त्या प्रियांकला ओळखायची जो खूप ईमानदार आणि केयरिंग होता. माझ्यासाठी त्याच्या मनात जे प्रेम होतं किंवा फिलिंग्स होती तो दिखावा नव्हता. पण आता तो तसा नाही आहे.'

मला वाटतं की, 'आताचा प्रियांक खरा आहे. मी आता पूर्णपणे त्याच्यापासून वेगळी झाली आहे. जे तो बिग बॉसमध्ये बेनाफ्शा सोबत करतोय तेच तो स्पलिट्सविलामध्ये माझासोबत करायचा. त्याला प्रत्येक शोमध्ये मुलगी पाहिजे.'

बेनाफ्शा देखील आता बिग बॉस मधून बाहेर झाली आहे. त्यामुळे आता पुढे काय होतं हे पाहावं लागेल.