व्हायरल क्लिपवर पहिल्यांदाच बोलली गदर-2 ची अभिनेत्री; माझ्याकडे त्यापेक्षा मोठी बातमी आहे!

Simrat Kaur Viral Clips :  सिमरत कौरनं सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या तिच्या एका व्हायरल इंटिमेट व्हिडीओवर तिची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Aug 10, 2023, 12:52 PM IST
व्हायरल क्लिपवर पहिल्यांदाच बोलली गदर-2 ची अभिनेत्री; माझ्याकडे त्यापेक्षा मोठी बातमी आहे! title=
(Photo Credit : Social Media)

Simrat Kaur Randhawa Viral Video: बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा 'गदर 2' (Gadar 2) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख घोषित झाल्यापासून हा चित्रपट चर्चेत आहे. चित्रपट उद्या प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अनेक कलाकार आहेत. मात्र, या चित्रपटातून अभिनेत्री सिमरत कौर रंधावा (Simrat Kaur Randhawa) ही या चित्रपटातून पदार्पण करणार आहे. या चित्रपटात ती आपल्याला मुस्कान या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटानिमित्तानं दिलेल्या एका मुलाखतीत सिमरतनं अनेक गोष्टींवर वक्तव्य केलं आहे. त्यावेळी ती तिच्या व्हायरल व्हिडीओवर देखील बोलली आहे. 

बॉलिवूड लाइफला दिलेल्या मुलाखतीत सिमरत सुरुवातीला तिच्या चित्रपटातील कास्टिंग विषयी सांगताना म्हणाली की 'माझी पहिली प्रतिक्रिया ही थोडी वेगळी होती. माझी निवड करण्यात आली तेव्हा मी गार पडले होते. तीन दिवस ही गोष्ट फक्त मला आणि माझ्या आईला माहित होती. इतर कोणाला नाही. माझ्या वडिलांना आणि बहिणीला देखील नाही. हे खरंच होतंय हे जाणून घेण्यासाठी मी तीन दिवस घेतले. यात काही बदल तर नाही ना हे कळनं महत्त्वाचं होतं. तिसऱ्या दिवशी मी माझ्या बहिणीला कॉल केला आणि तिला सांगितलं की मला असं वाटतंय की मी 'गरद 2' करते. ती म्हणाली मला वाटतंय म्हणजे काय? मी म्हटलं की म्हणजे त्यांनी मला मिठाई खाऊ घातली आणि म्हणाले की तुझं सिलेक्शन झालं आहे. माझ्या बहिणीला खूप आनंद झाला आणि मी भावूक झाले की मी हा चित्रपट करते. त्यामुळे हा एक भावूक क्षण होता, पण मी जास्त उत्साही न होता शांत राहण्याचा निर्णय घेतला. कारण मला या गोष्टीला आणि या प्रवासाला नजर लावायची नव्हती. अजून मला ती गोष्ट सहन होत नाही आहे की माझा चित्रपट येतोय. त्यामुळे 10 ची रात्र ही खूप कठीण असणार.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : 'बाहुबली' बनवणाऱ्या निर्मात्याच्या चित्रपटात दिसणार प्रवीण तरडे म्हणाले, 'त्यांनी मला पाहताच...': 

सिमरत यापुढे तिच्या व्हायरल झालेल्या इंटिमेट क्लिपवर देखील वक्तव्य केलं आहे. सिमरत तिच्यावर होणाऱ्या ट्रोलिंगवर म्हणाली की 'मला असलेली उत्सुकता ही खूप जास्त आहे. माझ्याकडे असलेली उत्सुकता ही सध्या होत असलेल्या प्रकरणात मोठी बातमी आहे. तर जसं मी म्हटलं की मी या सगळ्यातून बाहेर आलेले नाही की मी खरंच 'गदर 2' करते. मी अजून ते पचवू शकले नाही की मी गदर 2 करते. माझी उस्तुकता इतकी आहे की त्याच्यासमोर दुसरीकडे काय होतयं याच्याशी मला काहीही घेणं देणं नाही. त्यामुळे माझ्याकडे त्यापेक्षा मोठी बातमी ही आहे की मी गदर 2 चा भाग आहे.'