जिनिलिया देशमुखची एकुण संपत्ती किती माहितीये का?

जिनिलियाचा आज 35 वा वाढदिवस आहे. 

Updated: Aug 5, 2022, 06:00 PM IST
जिनिलिया देशमुखची एकुण संपत्ती किती माहितीये का?  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जिनिलिया डिसूझा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. आज जिनिलियाचा वाढदिवस आहे. जिनिलियाचा जन्म 5 ऑगस्ट 1987 रोजी मुंबईत झाला असून आज ती तिचा 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. जिनिलिया सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. सोशल मीडियावर तिच्या लाइफस्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते. जिनिलिया एक लग्जरी लाइफस्टाइल जगते. चला तर जिनिलियाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं काही खास गोष्टी जाणून घेऊया...

जिनिलियानं 2003 मधे 'तुझे मेरी कसम' या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण केलं. या चित्रपटात जिनिलियासोबत अभिनेता रितेश देशमुखनं मुख्य भूमिका साकरली होती. पहिल्या भेटीत जिनिलियाला रितेश अजिबात आवडला नाही. तिला वाटलं की, हा महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याचा मुलगा आहे तर त्याला खूप अॅटिट्यूड असेल. मात्र, हळूहळू या चित्रपटावेळी दोघेही एकमेकंच्या प्रेमात पडले होते. जवळपास 9 वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. जिनिलिया आणि रितेश यांना दोन मुलेही आहेत. त्यांचं नाव रियान आणि राहिल असं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

जिनिलियालं अमिताभ बच्चन यांच्यासोबत एक जाहिरात केली होती आणि त्या जाहिरातीतून तिला ओळख मिळाली. त्यावेळी जिनिलिया फक्त 15 वर्षांची होती. अभिनयासोबतच खेळातही तिला आवड होती. ती एके काळी राष्ट्रीय स्तरावरील फुटबॉलपटू राहिली आहे. जिनिलियाची एकूण संपत्ती 42 कोटी रुपये आहे. जिनिलिया लग्नानंतर अवघ्या 10 वर्षांनी पुन्हा चित्रपटसृष्टीत कमबॅक करणार आहे. जिनिलिया मराठी आणि दाक्षिणात्य चित्रपटांच्या कामांमध्ये व्यस्त असल्याचं समोर येतंय.