प्रसुतीच्या काही दिवसांआधी सोनम कपूरची प्रकृती बिघडली

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर सध्या पहिल्या प्रेग्नेंसीच्या टप्प्यात आहे.

Updated: Aug 5, 2022, 05:57 PM IST
प्रसुतीच्या काही दिवसांआधी सोनम कपूरची प्रकृती बिघडली   title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर सध्या पहिल्या प्रेग्नेंसीच्या टप्प्यात आहे. सोनम कपूर तिच्या पहिल्या बाळाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. दरम्यान, अभिनेत्रीने तिची प्रकृती ठिक नसल्याचा फोटो तिच्या चाहत्यांना अपडेट केला आहे. अभिनेत्रीची तब्येत बरी नसल्याचं फोटोला दिलेल्या कॅप्शनवरूनही स्पष्ट झालं आहे. सध्या सोनम कपूरला प्रेग्नसीचा नववा महिना सुरु आहे आणि अभिनेत्री या महिन्यात आपल्या मुलाला जन्म देणार आहे.

अभिनेत्रीचे पाय सुजले
सोनम कपूर तिच्या प्रेग्नेंसी पीरियडची झलक चाहत्यांसोबत नेहमी शेअर करते. नुकतीच सोनम कपूरही अशाच काही कारणाने चर्चेत आली आहे. सोनमने स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती प्रेग्नेंसीमुळे तिचे पाय कसे सुजले आहेत हे सांगताना दिसत आहे. सोनमचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोनमचं कॅप्शन
सोनम कपूरने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती बेडवर पडली असून ती तिच्या पायाचा फोटो काढताना दिसत आहे. या फोटोत तिने साधा- सिंपल पायजमा घातला असून तिच्या पायाला सूज आल्याचं फोटोत दिसत आहे. हा फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'कधीकधी गर्भधारणा सुंदर नसते'.

सोनम कपूरचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इतर अनेक गर्भवती महिलांनीही गरोदरपणात पाय सुजल्याचा अनुभव शेअर केला आहे. गरोदरपणात पती आनंद आहुजा सोनम कपूरची काळजी घेत आहेत. सोनम कपूर अनेकदा सोशल मीडियावर तिच्या पतीच्या मदतीबद्दल बोलताना दिसली आहे. त्याचबरोबर,  संपूर्ण कुटुंब सोनमच्या प्रेग्नेंसीबद्दल  खूप उत्सुक आहेत.