Gauri Khan Birthday : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खानचा आज 8 ऑक्टोबर रोजी 53 वा वाढदिवस आहे. गौरीला तिच्या वाढदिवसानिमित्तानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सगळेच शुभेच्छा देत आहेत. त्यात शाहरुखच्या चाहत्यांची संख्या सगळ्यात जास्त आहे. त्याचं कारण म्हणजे शाहरुखनं अनेकदा खुलासा केला आहे की त्याच्या करिअरमध्ये सगळ्यात मोठा वाट असणाऱ्यांमध्ये गौरी एक आहे. पण तुम्हाला एक गोष्ट माहित आहे का की एकवेळ अशी होती जेव्हा गौरीची इच्छा होती की शाहरुखचे चित्रपट फ्लॉप झाले पाहिजेत. त्याचं कारण काय हे आज आपण जाणून घेऊया...
गौरीनं एका मुलाखतीत खुलासा केला होता की शाहरुखचे चित्रपट फ्लॉप झाले पाहिजे अशी तिची इच्छा होती. त्याचं कारण देखील तिनं सांगितलं आहे. गौरीनं फॅशन डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांच्या एका मुलाखतीत गौरी खाननं सांगितलं की 'मी माझ्या नवऱ्याला नेहमी पाठिंबा देत होती हे सत्य नाही. याविषयी सांगत गौरी म्हणाली, 'मला त्याचं मुंबईत येणं आवडलं नव्हतं. मला तर खरंच या गोष्टीविषयी कळलंच नाही की तो कधी इतका मोठा कलाकार झाला. सुरुवातीला येथे येणं, चित्रपट आणि इतर गोष्टींचा सामना करणं माझ्यासाठी कोणत्याही मोठ्या धक्क्यापेक्षा कमी नाही.'
याविषयी स्पष्ट सांगत गौरी खान म्हणाली की 'आमच्यासाठी हे खूप कठीण होतं. माझी खरंच इच्छा नव्हती की त्याचे चित्रपट यशस्वी ठरायला हवे. कारण मला वाटयचं जर चित्रपट फ्लॉप झाले तर मी परत दिल्ली जाईन. कारण जेव्हा तुम्ही तरुण असता आणि त्यातही माझं लग्न हे 21 व्या वयात झालं होतं. चित्रपट काय आहेत, कोणत्या गोष्टी कोणत्या प्रकारे सुरु असतात, या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी नवीन होत्या. माझ्यासाठी तर असं होतं की काहीच चाललं नाही पाहिजे आणि शाहरुख खानचा प्रत्येक चित्रपट फ्लॉप झाला पाहिजे. सुरुवातीला त्याचे चित्रपट चांगलं काम करत होते तेव्हा मला कळलंच नाही.'
हेही वाचा : VIDEO : ट्रान्सपरंट टॉप परिधान केल्यानं प्रियांकाची आई मधू ट्रोलर्सच्या निशाण्यावर!
गौरी खाननं पुढे सांगितलं की 'तुम्ही अनेक गोष्टी काही काळानं विसरू लागतात. 'दीवाना' चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आणि जो पर्यंत आम्ही काही समजू शकू तोपर्यंत 'दिलवाले' आला. मला कळलंच नाही की तो कधी इतका मोठा स्टार झाला.'
गौरी पुढे शाहरुखविषयी बोलताना म्हणाली की 'शाहरुख हा महत्त्वाकांशी होता. लहाणपणापासून, शाळेत, कॉलेजमध्ये तो नेहमीच टॉपला असायचा, मग ते फुटबॉल असो, हॉकी असो, थिएटर असो किंवा जी पण गोष्ट त्यानं केली, थोडक्यात ज्यानं ज्यापण गोष्टीला हात लावला ते सोन झाली. याचा अर्थ मी योग्य व्यक्तीची निवड केली. मी खूप भाग्यवान आहे की तो माझ्या आयुष्यात आहे.'