'मी स्वतःला खोलीत बंद केलं, तो माझा हात सोडत नव्हता.' सुपरस्टारच्या या कृतीला घाबरली गौहर खान

गौहर खान आज एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने टीव्हीपासून चित्रपटांपर्यंतच्या जगात उत्तम कामगिरी केली आहे. पण अभिनेत्री होण्याआधी ती एक यशस्वी मॉडेल आणि व्ही.जे. होती. 

Updated: Oct 23, 2023, 07:26 PM IST
'मी स्वतःला खोलीत बंद केलं, तो माझा हात सोडत नव्हता.' सुपरस्टारच्या या कृतीला घाबरली गौहर खान title=

मुंबई : गौहर खान आज एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने टीव्हीपासून चित्रपटांपर्यंतच्या जगात उत्तम कामगिरी केली आहे. पण अभिनेत्री होण्याआधी ती एक यशस्वी मॉडेल आणि व्ही.जे. होती. गौहर खानने त्या दिवसांची एक घटना सांगितली, ज्यामुळे ती अस्वस्थ झाली आणि तिने स्वतःला खोलीत बंद करून घेतलं. एका सुपरस्टारमुळे गौहर खानने हे केले. गौहर खानच्या म्हणण्यानुसार, त्या सुपरस्टारमुळे ती खूप घाबरली होती.

गौहर खानने 'बॉलिवूड बबल'शी संवाद साधताना हा संपूर्ण किस्सा सांगितला. तेव्हा ती फक्त 18 वर्षांची होती. गौहर खानने मात्र त्या सुपरस्टारचे नाव सांगितलं नाही. पण तो या जगात नाही हे तिने यावेळी निश्चितपणे उघड केलं आणि तिने त्याच्या कामाचं आणि अभिनयाचा खूप कौतुकही केलं.

खरंतर या मुलाखतीमध्ये गौहर खानला असा प्रश्न विचारला की, तिच्या व्हीजेच्या दिवसात ती अशा कोणत्या स्टारला भेटली ज्याने नखरे दाखवले? यावर गौहर खान म्हणाली, 'तो माझा हात सोडत नव्हता. माझ्यासाठी ते खूप विचित्र होतं. मी माझा हात कसा खेचला असता?' गौहरने सांगितले की, ती संपूर्ण मुलाखतीत तशीच बसून राहिली. त्याचा हात त्या सुपरस्टारच्या हातात होता आणि तो तिचा हात सोडण्याची चिन्हे दिसत नव्हती.
 
गौहर खानने पुढे सांगितलं की, ती त्या स्टारच्या टॅलेंटची आणि कामाची खूप मोठी फॅन आहे आणि त्यामुळे तिला त्याला नाराज करायचं नव्हते. गौहरने पुढे सांगितले की, तिच्या दिग्दर्शकाला काय चालले आहे ते समजले होतं. शूट संपल्यानंतर दिग्दर्शकाने गौहर खानला खोलीत जाऊन आतून लॉक लावण्यास सांगितलं. दिग्दर्शकाने असं का म्हटलं हे गौहरला समजले नाही. मात्र यानंतर लगेच तिने खोलीत जाऊन स्वत:ला कोंडून घेतलं.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

गौहर खानच्या म्हणण्यानुसार, नंतर तिला समजलं की तो सुपरस्टार दिग्दर्शकाकडून तिचा नंबर मागत होता. गौहर खान कुठे आहे आणि जाण्यापूर्वी ती त्याला का भेटली नाही, असे तो त्या दिग्दर्शकला विचारत होता. गौहर खानला आश्चर्य वाटलं की, नक्की तिच्यासोबत काय होत आहे ते तिला समजत नव्हतं.