Gal Gadot Diagnosed with Blood Clot in Brain : हॉलिवूडच्या डीसी सुपरहीरोमध्ये वंडर वुमनची भूमिका साकारणारी इस्राइलची अभिनेत्री गॅल गडोट चर्चेत आहे. या वर्षाच्या सुरुवातीला गॅल गॅडोटनं तिच्या चौथ्या बाळाला जन्म दिला. तिच्या मुलीचं नाव ओरी आहे. आता गॅल गॅडोटनं खुलासा केला की तिच्या मेंदूत रक्तात गुठळ्या झाल्या आहेत. यासगळ्यामुळे तिला लगेच सर्जरी करावी लागली. गॅल गडोटनं सांगितलं की तिची प्रेग्नंसी सोपी नव्हती. तिनं सेरेब्रल वेनस थ्रोम्बोसिस असल्याचं कळलं. ज्यामुळे मेंदूत ब्लड क्लॉट आहे हे कळलं. त्याशिवाय तिनं सांगितलं की 30 पेक्षा जास्त वय असलेल्या 100,000 महिलांपैकी 3 ला होतो.
गॅल गडोटनं सोमवारी सकाळी तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. यात गॅल गडोटनं तिचा हॉस्पिटलमधील एक फोटो शेअर केला आहे. यात ती नुकत्याच जन्मलेला मुलीसोबत दिसत आहे. इतकंच नाही तर ती त्या मुलीला स्तनपान करताना दिसते. तर तिच्या दुसऱ्या हातात कॉफी आहे. हा फोटो शेअर करत गॅल गडोटनं कॅप्शन दिलं की हे वर्ष खूप मोठ्या आव्हानं आणि खूप जास्त चिंतेचं कारण ठरलं. मी अशा गोष्टींचा सामना करत राहिले की कशाप्रकारे एक खासगी गोष्ट शेअर करु. सगळ्यात शेवटी मी माझ्या हृदयाचं म्हणणं ऐकण्याचं ठरवलं. मला आशा आहे की हे शेअर करून मी सगळ्यांमध्ये जागरुकता वाढवू शकते आणि दुसऱ्यांचे समर्थन करु शकते.
याविषयी सांगत गॅल गडोट पुढे म्हणाली,'फेब्रुवारीमध्ये प्रेग्नंसीच्या 8 व्या महिन्यां दरम्यान मला माहित झालं की माझ्या मेंदूत खूप मोठ्या रक्ताच्या गुठळ्या झाल्या आहेत. अनेक आठवडेमला खूप जास्त डोकं दु:खू लागलं. यामुळे मी बेडवरून झोपूनच होते. जेव्हा मी एमआरआय केला, ज्यातून एक सत्य समोर आलं. एका क्षणासाठी मला आणि माझ्या कुटुंबाला एका गोष्टीचा सामना करावा लागला की आयुष्य किती नाजुक असू शकतं. एखाद्या वर्षात किती संकटं येऊ शकतात. माझी फक्त एकच इच्छा आहे की मी या सगळ्याचा सामना करु शकेन आणि आणखी आयुष्य जगू.'
हेही वाचा : 91 व्या वर्षी आशा भोसले यांनी 'तौबा तौबा' गात केला डान्स! गायकापासून सर्वांकडून कौतुकाचा वर्षाव
गॅल गडोटनं पुढे सांगितलं की 'आम्ही रुग्णालयात पोहोचलो आणि काही तासातच मी माझी एमरजेंसी सर्जरी केली. माझ्या लेकीचा ओरीचा जन्म हा प्रचंड कठीण परिस्थितीत झाला. तिचं जिवंत राहणं देखील कठीण होतं. आज मी पूर्णपणे ठीक आहे आणि मला माझं आयुष्य पुन्हा मिळालं आहे. या प्रवासानं मला खूप काही शिकवलं. सगळ्यात आधी तुमचं शरीर जे सांगतंय त्याकडे लक्ष द्या आणि त्यावर विश्वास ठेवणं बंद करा. काही समस्या किंवा शरीरात होणारे छोटे बदल देखील खूप महत्त्वाचे असतात.'