'गदर 2' ने रचला इतिहास! ठरला हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट

Gadar 2 Highest Grossing Hindi Film : 'गदर 2' नं हिंदी चित्रपटसृष्टीत रचला नवा इतिहास... बॉक्स ऑफिसवर केली इतक्या कोटींची कमाई...

दिक्षा पाटील | Updated: Sep 28, 2023, 06:41 PM IST
'गदर 2' ने रचला इतिहास! ठरला हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट title=
(Photo Credit : Social Media)

Gadar 2 Highest Grossing Hindi Film : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत असताना. दुसरीकडे सनी देओलचा 'गदर 2' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सध्या बऱ्यापैकी कमाई करत असताना त्यानं एक नवा रेकॉर्ड केला आहे. 'गदर 2' नं प्रदर्शनाच्या 48 व्या दिवशी शाहरुख खानच्या पठाणला मागे टाकत हिंदी चित्रपटसृष्टीत सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. पठाण चित्रपटानं 9 व्या आठवड्यात हिंदी भाषेत 524.53 कोटींची कमाई केली होती. तर 'गदर 2' नं 524.75 कोटींची कमाई केली आहे. हा रेकॉर्ड काही दिवसांचा आहे. तर शाहरुखच्या जवाननं तीन आठवडयात 519.69 कोटींची कमाई केली. त्यामुळे आता काही दिवसात 'जवान' हा 'गदर 2' च्या पुढे जाणार का याकडे लक्ष लागले आहे. 

किती आहे 'गदर 2' चं कलेक्शन?

 'गदर 2' ला प्रदर्शनाचे सात आठवडे पूर्ण झाले आहेत. प्रदर्शनाच्या 48 व्या दिवशी या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर फक्त 40 लाख रुपयांचा कमाई केली. अनिल शर्मा दिग्दर्शित या चित्रपटानं 524.75 कोटींची एकूण कमाई केली आहे. हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीत सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट आहे. तर वर्ल्ड वाईड कलेक्शनमध्ये चित्रपटानं 684.75 कोटीची कमाई केली. 'गदर 2' आता आपल्याला थिएटरमध्ये पाहता येणार नाही कारण ओटीटीवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 

'जवान'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन?

शाहरुख खानच्या 'जवान' बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. sacnilk नं दिलेल्या रिपोर्टनुसार, एटली दिग्दर्शित या चित्रपटानं बुधवारी बॉक्स ऑफिसवर 21 व्या दिवशी 4.85 कोटींची कमाई केली. त्यात हिंदी भाषेत या चित्रपटानं 4.45 कोटींची कमाई केली. तर तमिळमध्ये चित्रपटानं 20 लाख आणि तेलगूमध्ये 20 लाख रुपये कमाई केली. जवाननं 21 व्या दिवसापर्यंत एकूण 575.93 कोटींची कमाई केली आहे. तर हिंदी भाषेत या चित्रपटानं 519.69 कोटींची कमाई केली आहे. 

हेही वाचा : दरवर्षी घरी का होते एकाच बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा? श्रेयस तळपदेचा खुलासा, म्हणाला 'ती अचानक रडू लागली अन्...'

जवान ज्या प्रकारे कमाई करत आहे, त्या प्रमाणे शुक्रवारी 23 व्या दिवशी 'गदर 2' ला मागे टाकत हिंदीत सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरेल. 2023 च्या सुरुवातीला किंग खानच्या पठाण या चित्रपटानं आमिर खानच्या दंगल चित्रपटाला मागे टाकत एक रेकॉर्ड केला होता. तर आता 'गदर 2' नं ही जागा घेतली आहे. 'गदर 2' कडे ही जागा दोन दिवसांसाठी असेल अशा चर्चा सुरु आहेत. तर ती जागा 'जवान' लवकरच घेईल अशी चर्चा सुरु आहे.