'गच्ची' सिनेमाचा टीझर रिलीज

शहरात बिल्डिंगची गच्ची तशी निवांत जागा असते, यात शांत बसून गंभीर विषयांवर बोलता येतं.

Updated: Oct 29, 2017, 12:21 AM IST

मुंबई : शहरात बिल्डिंगची गच्ची तशी निवांत जागा असते, यात शांत बसून गंभीर विषयांवर बोलता येतं, आनंद देखील साजरा करता येतो. 

सुख दु:खात, सर्वांच्या भावनांना वाट करून देणारी, निवांत क्षणी प्रत्येकाला हवी हवीशी वाटणारी गच्ची आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.गच्ची या सिनेमाचा टीझर नुकताच प्रकाशित झाला.

नचिकेत सामंत दिग्दर्शित या सिनेमातील मुख्य कलाकार अभय महाजन आणि प्रिया बापटच्या 'गच्ची' चित्रपटाचे टीझर लाँच करण्यात आले.