मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं दुबईत कार्डिअॅक अरेस्टने निधन झालं. सोमवारी सकाळी त्यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार होणार आहेत. आज रात्री ८ वाजेपर्यंत पार्थिव मुंबईत आणले जाणार आहे.
त्यांच्या शेजारीही या धक्क्यातून अजून सावरले नाहीत. त्या खूप फिट असायच्या, दररोज २ तास चालायच्या असे एका शेजाऱ्याने सांगितले. सर्वांशी प्रेमाने बोलायच्या. जान्हवी आणि खुशी दोघींना त्यांनी आपल्या ट्रेनिंगमध्ये ठेवले होते.
त्या दोघी खूप कमी बाहेर दिसत. महिन्यातून एकदा प्रभूदेवा मुलांना डान्स शिकवायला येत असेही शेजाऱ्यांनी सांगितले.
श्रीदेवी यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी ११ वाजता मुंबईत अंत्यसंस्कार होणार आहेत.
दुबईहून त्यांचं पार्थिव शरीर आज रात्री ८ वाजता मुंबईत येण्याची शक्यता आहे. दुबईतच श्रीदेवी यांच्या पार्थिवाच पोस्टमार्टम झालं. अनिल अंबानी यांच जेट पार्थिव आणण्यास रवाना झाल्याच वृत्त आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, शनिवार रात्री 11 वाजता श्रीदेवी हॉटेलच्या बाथरूममध्ये पडल्या.
त्यानंतर त्यांना तात्काळ राशिद रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं. दुबईतील प्रसिद्ध जुमेराह इमीरात हॉटेलमध्ये त्या थांबल्या होत्या.
श्रीदेवी या आपल्या कुटुंबियांसोबत एका विवाह सोहळ्यासाठी दुबईला गेल्या होत्या. श्रीदेवींच्या निधनाने संपूर्ण बॉलिवूडवर विश्वावर शोककळा पसरली आहे. अनेकांना या बातमीने धक्का बसला आहे.