हृतिकपासून ते समंथा पर्यंत सेलिब्रिटी 'या' गंभीर आजाराने त्रस्त

वाचा कोणते कलाकार कोणत्या आजाराने त्रस्त?   

Updated: Feb 11, 2022, 03:11 PM IST
हृतिकपासून ते समंथा पर्यंत सेलिब्रिटी 'या' गंभीर आजाराने त्रस्त title=

मुंबई : रुपेरी पडद्यावर कलाकार प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचं काम करतात. कितीही  संकट, त्रास, आजार असला तरी कलाकारांना स्वतःच्या सर्व गोष्टी मागे ठेवत अभिनयाच्या विश्वात वावरायचं आसतं. प्रेक्षकांना अभिनेता किंवा अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर असलेला मेकअप आणि त्यांची स्टाईल दिसते. पण खऱ्या आयुष्यात काही कलाकारांनी मोठ्या आजारांवर मात केली आहे. आशाच काही कलाकारांबद्दल आपण आज जाणून घेवू...

अभिनेता हृतिक रोशन 
हृतिक रोशनला स्पाइनल स्टेनोसिसचा त्रास झाला. ज्यामुळे त्याच्या मणक्यामध्ये एक वक्र तयार झाला होता, ज्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. आता हृतिक पूर्णपणे ठिक आहे. 

अभिनेत्री समंथा प्रभू
सामंथाला ऑलिमॉर्फस लाइट  इरप्शन नावाचा आजार 2012 साली झाला होता. ती आता पूर्णपणे ठिक आहे.

अभिनेता सलमान खान
सलमान खान एकदा ट्रायजेमिनल न्यूरलजी या आजाराने ग्रस्त होता, त्यानंतर त्याचा चेहरा दुखू लागला. त्याने या आजारावर मात केली.

अभिनेत्री दीपिका पादुकोण
अभिनेत्री दीपिका पादुकोण डिप्रेशनमध्ये गेली होती. दीपिकाने तिच्या आजाराबद्दल उघडपणे सांगितलं. आता दीपिका पूर्णपणे ठिक आहे.