VIDEO : 'बिग बॉस सीझन ११... पड़ोसी बजाएंगे १२'

बहुचर्चित आणि बऱ्याचदा वादग्रस्त 'बिग बॉस' हा रिअॅलिटी शो पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर दाखल होतोय. 

Updated: Aug 19, 2017, 11:04 AM IST
 VIDEO : 'बिग बॉस सीझन ११... पड़ोसी बजाएंगे १२' title=

मुंबई : बहुचर्चित आणि बऱ्याचदा वादग्रस्त 'बिग बॉस' हा रिअॅलिटी शो पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर दाखल होतोय. 

बिग बॉसचा हा ११ वा सीझन आहे. या कार्यक्रमाचा होस्ट कोण असेल? यावर बरीच चर्चा झाली... अक्षय कुमारपासून रणवीरपर्यंत अनेक नावं समोर आली... पण आता मात्र या प्रश्नावर पूर्णविराम लागलाय. कारण, या कार्यक्रमाचा पहिला प्रोमो सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलाय. 

या प्रोमोमध्ये अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा या कार्यक्रमाचं होस्टिंग करणार हे स्पष्ट दिसतंय. 

यंदाच्या सीझनमध्ये टीव्ही सीरिअलमधली गोपी बहू म्हणजे देवोलीना भट्टाचार्य, ढिंचॅक पूजा, मॉडेल-अभिनेत्री अर्शी खान असे चेहरे दिसण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.