माधुरी दीक्षितवर बनणार्‍या अमेरिकन शोची प्रियांका चोप्रा बनणार निर्माती !

बॉलिवूडची धक धक  गर्ल माधुरी दीक्षितच्या जीवनावर अमेरिकेत एक खास कार्यक्रम बनवला जात आहे.

Updated: Aug 19, 2017, 10:38 AM IST
माधुरी दीक्षितवर बनणार्‍या अमेरिकन शोची प्रियांका चोप्रा बनणार निर्माती !   title=

मुंबई : बॉलिवूडची धक धक  गर्ल माधुरी दीक्षितच्या जीवनावर अमेरिकेत एक खास कार्यक्रम बनवला जात आहे.

या कार्यक्रमाची कार्यकारी निर्माता प्रियांका चोप्रा आहे.  

माधुरी दीक्षितनेही प्रियांका चोप्रा या कार्यक्रमाची निर्माता ही योग्य निवड असल्याचे सांगितले आहे. 

एका मुलाखतीमध्ये माधुरी म्हणाली, ' जेव्हा श्री राव यांनी २०१६ साली या कार्यक्रमाबद्दल मला सांगितले. माझ्या जीवनावर आधारित अशाप्रकारच्या कार्यक्रमाची निर्मिती होणार आहे ही गोष्ट मला सुरूवातीला थोडी धक्कादायक वाटली.'

 

माधूरी दीक्षितने डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न  केल्यानंतर काही काळ ती बॉलिवूडपासून थोडी लांब झाली होती. माधूरीने आपला संसार अमेरिकेत थाटला. दोन मुलांच्या जन्मानंतर माधूरी पाच वर्षांपूर्वी हिंदी सिनेसृष्टीत  पुन्हा परतली आहे.आता माधूरी सलग काही प्रोजेक्ट करत आहे.