अक्षयच्या 'केसरी' सिनेमाच्या सेटला अचानक लागली आग

अक्षयकुमार सोबत अभिनेत्री परीणीती चोप्रा या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. 

Updated: Apr 24, 2018, 11:40 PM IST
अक्षयच्या 'केसरी' सिनेमाच्या सेटला अचानक लागली आग title=

सातारा : साताऱ्यात पिंपोडे बुद्रुक गावामध्ये अक्षयकुमारच्या 'केसरी' सिनेमाचं शूटिंग सुरु असताना सिनेमाच्या सेटवर अचानक आग लागली. फटाके फोडण्याचं दृष्य चित्रीत केलं जात असतांना ही आग लागली. या चित्रपटाचं अद्याप दहा दिवसांचं शूटिंग बाकी होतं. आगीत बहुतांश सेट जळून खाक झालाय. चित्रपटाचा सेट जळाल्यामुळे या चित्रपटाचं शूट थांबवण्यात आलंय.

आता या चित्रपटाचा सेट पुन्हा करण्यात येणार आहे.. केसरी हा चित्रपट साराग्रहींच्या लढ्यावर आधारित आहे. अक्षयकुमार सोबत अभिनेत्री परीणीती चोप्रा या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. 

पुढच्या वर्षी होळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.