मुंबई : अभिनेता, निर्माता आदित्य पांचोलीविरोधात मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. अभिनेत्रीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी आदित्य पांचोलीवर भारतीय दंड संहिता कलम ३७६ अंतर्गत वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केला आहे. एफआयआरमध्ये आदित्यवर अनेकदा बलात्कार केल्याचे आरोप लावण्यात आले आहेत. १० वर्ष जुन्या प्रकरणात पोलिसांकडून चौकशी सुरु करण्यात आली आहे.
Mumbai Police files an FIR of rape against actor-producer Aditya Pancholi. pic.twitter.com/oE5XtAnNKd
— ANI (@ANI) June 27, 2019
एका अभिनेत्रीने आदित्यवर शारीरिक आणि मानसिकरित्या अत्याचार केल्याचा आरोप लावला आहे. याप्रकरणी तपास सुरु करण्यात आला आहे. परंतु हे प्रकरण १० वर्षांपूर्वीचे असल्याने याप्रकरणी पुरावे जमा करणे कठीण असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.