Afghanistan Crisis : या करणामुळे तालिबानकडून बॉलिवूड कलाकारांना धमकी

अफगाणिस्तानवर अनेक बॉलिवूड चित्रपट आधारिकत आहेत; पण...

Updated: Aug 17, 2021, 09:56 AM IST
Afghanistan Crisis : या करणामुळे तालिबानकडून बॉलिवूड कलाकारांना धमकी title=

मुंबई : अफगाणिस्तानमधील परिस्थिती सध्या फार भयानक आहे. येथे तालिबानने कब्जा केल्यामुळे जगातले सर्व देश सतर्क झाले आहेत. महत्त्वाचं म्हणजे अफगाणिस्तान आणि बॉलिवूडचं देखील नात आहे. अफगाणिस्तानवर आधारित अनेक चित्रपट  बॉलिवूडमध्ये साकारण्यात आले. अनेक चित्रपटांचं  चित्रीकरण अफगाणिस्तानमध्ये झालं. हेमा मालिनी - फिरोझ खान, अमिताभ बच्चन - श्रीदेवी अशा अनेक मोठ्या स्टार्सने अफगाणिस्तानमध्ये शुटिंग केलं. पण एका चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यान तालिबानने धमकी दिली होती. 

 'तोरबाज'
अभिनेता संजय दत्त स्टारर  'तोरबाज' चित्रपटाची शुटिंग अफगाणिस्तानमध्ये झाली. चित्रपटात संजयने भारतीय दुतावासात राहणाऱ्या एका भारतीय डॉक्टरची व्यक्तीरेखा साकारली. या डॉक्टरने त्याच्या कुटुंबाला गमावलं होतं. चित्रपटाचे दिग्दर्शक गिरीश मलिक यांनी अफगाणिस्तानमध्ये शूटिंग करणं फार अव्हानात्मक असल्याचं त्यांनी सांगितलं. 

'धर्मात्मा'
फिरोझ खान आणि हेमा मालिनी यांच्या 'धर्मात्मा' चित्रपटाची शुटिंग अफगाणिस्तानमध्ये झाली होती. अफगाणिस्तानमध्ये चित्रीत होणारा हा पहिला बॉलिवूड चित्रपट होता. 

'गवाह'
अभिनेते अमिताभ बच्चन आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या 'गवाह' चित्रपटाची शुटिंग अफगाणिस्तानमध्ये झाली होती. अमिताभ यांच्यासाठी मुजाहिद्दीनने एक दिवस लढाई देखील थांबवली होती. कारण बिग बी शहरात फिरू शकतील. 

'काबूल एक्सप्रेस'
2005 साली प्रदर्शित झालेल्या 'काबूल एक्सप्रेस'ची शुटिंग अफगाणिस्तानमध्ये झाली. तेव्हा अभिनेता जॉन अब्राहम, अर्शद वारसी आणि चित्रपटाच्या पूर्ण टिमला तालिबानला धमकी दिली होती.