सर्वांची आवडती दयाबेन अश्लील पोस्टमध्ये टॅग; ट्रोलर्सला म्हणाली...

'तारक मेहता...' फेम दयाबेन अश्लील पोस्टमध्ये टॅग; ट्रोलर्सला दिली चेतावणी 

Updated: Aug 17, 2021, 02:46 PM IST
सर्वांची आवडती दयाबेन अश्लील पोस्टमध्ये टॅग; ट्रोलर्सला म्हणाली... title=

मुंबई : लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिका प्रचंड आवडते. टप्पूसेनेची मस्ती आणि गोकूळ धाम सोसायटीमधील रहिवाशांची ऐकी... मालिकेची ओळख आहे. मालिकेतील दयाबेनच्या प्रतीक्षेत आजही चाहते आहेत. 2017 नंतर अभिनेत्री दिशा वकाणी मालिकेत कधी दिसलीच नाही. आता फक्त ती पुन्हा येणार आशी चर्चा रंगत आहे, पण कधी हे कोणालाही माहिती नाही. तारक मेहतामध्ये दिशा तिच्या खास शैलीमुळे आणि गरब्याच्या अनोख्या  अंदाजामुळे प्रसिद्धीझोतात आली. 

पण आता मात्र एका गंभीर करणामुळे सर्वांची लाडकी दयाबेन चर्चेत आली आहे. 2018 साली दिशा वकाणीला सोशल मीडियावर अश्लील पोस्टमध्ये टॅग केलं जात होतं. त्यानंतर दिशाने अश्लीलमध्ये टॅग करणाऱ्या ट्रोलर्सवर नाराजी व्यक्त करत चेतावणी दिली. 'जर टॅग करणं बंद केलं नाही तर गंभीर परिणाम भोगायला तयार राहा...'

या अश्लील पोस्टमध्ये टॅग केल्यानंतर दिशाला सोशल मीडियावर ट्रोलचा सामना करावा लागला. ट्रोलिंगचा मोठ्या प्रमाणात सामना केल्यानंतर दिशाने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली, ज्यामध्ये तिने लिहिलं की, 'ही शेवटची चेतावणी आहे... मला अयोग्य, अश्लील आणि आक्षेपार्ह पोस्टमध्ये टॅग करणे थांबवा..' अशा प्रकारे दिशाने ट्रोलर्सना खडसावले. 

दरम्यान, मालिकेत पुन्हा पदार्पण करण्याची दिशाची इच्छा आहे. पण मानधन अधिक मागत असल्यामुळे मालिकेच्या निर्मात्यांनी नकार दिला आहे. त्यामुळे येत्या काळात दिशा मालिकेत पुन्हा दिसेल की नाही हे येणारा काळचं ठरवेल.