तारक मेहता - जेठालालमध्ये नक्की काय बिनसलं? सेटवर देखील अबोला

छोट्या पडद्यावर गोकूळ धाम सोसायटीमधील ऐकी दिसते, पण सत्य मात्र...

Updated: Mar 27, 2021, 11:27 AM IST
तारक  मेहता - जेठालालमध्ये नक्की काय बिनसलं? सेटवर देखील अबोला title=

मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका लहानमुलांपासून वृद्धांना देखील फार आवडते. मालिकेत गोकूळ धाम सोसायटीमधीन टप्पू सेनेची मस्ती, एकमेकांच्या मदतीला पुढे येणारे शेजारी, एकत्र साजरा होणारे सण इत्यादी गोष्टी चर्चेत असतात. गोकुळ धाम सोसायटीमध्ये कायम कल्ला असतो. या मालिकेने चाहत्यांच्या मनात एक वेगळी आणि खास जागा तयार केली आहे. मालिकेतील प्रत्येक भुमिका प्रेक्षकांच्या मनात आहे. 

मालिकेत जेव्हा जेठालाल अडचणीत असतात तेव्हा त्यांच्या समस्येचं निराकरण करण्यासाठी सर्वप्रथम तारक मेहता धावून येतात. मालिकेत एकमेकांचे इतके चांगले असणारे शेजारी आणि मित्र आहे. पण खऱ्या जीवनात मात्र ही जोडी बोलत देखील नाही. त्यामुळे छोट्या पडद्यावर जशी तारक-जेठालाल यांची मैत्री आहे,  तशी खऱ्या आयुष्यात मात्र नाही. 

सध्या दिलीप जोशी (जेठालाल) आणि शैलेश लोढा (तारक मेहता) गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांसोबत बोलत नाहीत. त्यांचे  वाद फार टोकाचे  आहेत. शुटिंग संपली तर दोघेही लगेच त्यांच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये निघून जातात. त्यांची मैत्री फक्त आपल्याला छोट्या पडद्यावर पाहायला मिळते. 

त्याचे वाद कशामुळे आहेत, हे कोणालात माहिती नाही. ही पहिलीचं वेळ नाही जेव्हा तारक मेहताच्या सेटवर कलाकारांमध्ये भांडणं झाली आहेत. याआधी दिलीप जोशी आणि मुनमुन दत्ता यांच्यात देखील बिनसलं होतं. तेव्हा  देखील दिलीप आणि मुनमुन चर्चेत आले होते.