Fifty Shades Of Grey: अभिनेत्री बोल्ड सीनवर म्हणाली, 'खूप वेदनादायक...'

जगातील सर्वात बोल्ड सिनेमांपैकी एक असणाऱ्या 'फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे'ला अनेक देशांमध्ये बॅन देखील करण्यात आल आहे.   

Updated: Jul 8, 2022, 02:35 PM IST
Fifty Shades Of Grey: अभिनेत्री बोल्ड सीनवर म्हणाली, 'खूप वेदनादायक...' title=

मुंबई :  हॉलिवूडमध्ये असे अनेक सिनेमे आहेत, जे फक्त आणि फक्त बोल्ड आणि इंटिनेट सीनमुळे चर्चेत आले. अशा सिनेमांमधील एक सिनेमा म्हणजे 'फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे' सिनेमा. जगातील सर्वात बोल्ड सिनेमांपैकी एक असणाऱ्या 'फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे'ला अनेक देशांमध्ये बॅन देखील करण्यात आल आहे. सिनेमा एका पुस्तकावर आधारित असून त्यात मुख्य भूमिकेत दिसलेली अमेरिकन अभिनेत्री डकोटा जॉनसन प्रचंड लोकप्रियता मिळाली. सिमेनात जेमी डोर्नन मुख्य भूमिका बजावली. 

2015 साली प्रदर्शित झालेल्या  'फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे' सिनेमाचा दुसरा भाग देखील प्रदर्शित झाला आहे. सिनेमात डकोटा जॉनसनने एका सध्या मुलीची भूमिका साकारली आहे. डकोटा सिनेमात अनास्तासिया नावाच्या मुलीची भूमिकेत दिसत आहे.

डकोटा जॉनसन (अनास्तासिया) अब्जाधीश ख्रिश्चन ग्रेशीच्या प्रेमात पडते. ज्याला हिंसक सेक्सची आवड असल्याचे सिनेमात दाखवण्यात आल आहे. सिनेमात सीन शूट करताना आलेले अनुभव यावेळी अभिनेत्रीने मोकळेपणाने सांगितले आहेत.

डकोटाने 'फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे' मध्ये चित्रित केलेल्या सीनबद्दल यापूर्वी देखील सांगितलं.  जेमीसोबत सिनेमाच शूटिंग करताना तिला प्रचंड वेदना झाल्या.  डकोटा जॉन्सनने सिनेमातील एका इंटिमेट सीनबद्दल सांगितलं, जेव्हा जेमी शुटिंग दरम्यान तिला बेडवर फेकून द्यायचा.

अभिनेत्री म्हणाली, 'मला बेडवर फेकल्यानंतर त्याने मला चाबकाने मारल. ती वेळ प्रचंड भयानक होती. या सीनसाठी 17 टेक्स घ्यावे लागले. त्यामुळे दिवसभर तिच डोके दुखत होतं. शेवटी तिची अवस्था अशी झाली की तिला मान हलवताही येत नव्हती. '

पुढे डकोटा म्हणाली, 'काही बोल्ड सीन्समुळे सेटवरील वातावरणही तणावपूर्ण झाले. अनेकदा या सर्व घटनेचा मला धक्का बसला. त्यानंतर मी सेटच्या बाहेर निघून जायचे.' असं डकोटा म्हणाली. 

डकोटा जॉन्सनने 2017 मध्ये 'फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे' आणि 2018 मध्ये 'फिफ्टी शेड्स फ्रीड'च्या सिक्वेलमध्ये अनास्तासिया स्टीलची भूमिका साकारली होती.