VIDEO: लेकाच्या संगीत सेरेमनीमध्ये Sunny Deol यांनी केला 'मैं निकाला गड्डी लेके' गाण्यावर डान्स

Sunny Deol Dances in Karan Deol Sangeet Ceremony: आपल्या लेकाची किंवी लेकीच्या लग्नात वडिलांनी नाचणं याची काही बातच न्यारी असते. सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे करण देओलच्या लग्नाची. यावेळी सनी देओल यानं आपल्या लेकाच्या संगीत सेरेमनीमध्ये डान्स केला आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Jun 17, 2023, 08:57 PM IST
 VIDEO: लेकाच्या संगीत सेरेमनीमध्ये Sunny Deol यांनी केला 'मैं निकाला गड्डी लेके' गाण्यावर डान्स title=
June 17, 2023 | Father of the bridegroom sunny deol dances on gadar film song mein nikla ho gaddi leke in his son karan deol sangeet ceremony (Photo: Viral Bhayani Instagram)

Sunny Deol Dances on Gadar Song Mein Nikla Gaddi Leke in Karan Deol Sangeet Ceremony: सध्या सगळीकडे चर्चा आहे ती म्हणजे सनी देओल यांच्या लेकाच्या लग्नाची. गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये 'लग्न'मय वातावरण आहे. के.एल राहूल आणि अथिया शेट्टी यांचे लग्न, मग सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा अडवाणी यांचे ड्रीम वेडिंग आणि मागच्या महिन्यात परिणिती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी उरकलेला साखरपुडा या एकामागून एक लग्नसोहळ्यानंतर आता बी-टाऊनमध्ये चर्चा आहे ती म्हणजे करण देओल आणि त्याची गर्लफ्रेंड दृषा आचार्य यांच्या लग्नाची. काही दिवसांपुर्वी त्यांनी रोका सेरेमनी संपन्न झाली आणि नुकताच त्यांचा संगीत सोहळाही पार पडला आहे. त्यामुळे त्यांच्या संगीत सेरेमनीचे इनसाईड फोटोज सध्या व्हायरल झाले आहेत. यावेळी आपल्या लेकाच्या लग्नासाठी सनी देओल यांनी 'गदर' या लोकप्रिय चित्रपटातील 'मैं निकाला गड्डी लेके' या त्याच्या गाण्यावर अफलातून डान्स केला आहे. त्यामुळे सनी देओल यांची चांगलीच चर्चा रंगली आहे. 

आज त्यांचा विवाहसोहळा संपन्न झाला आहे. परंतु काल 16 जूनला त्यांचा संगीत सोहळा संपन्न झाला होता. यावेळी कुटुंबातील सर्व मंडळी उपस्थित होती. बॉबी देओल आपल्या पत्नीसह उपस्थित होता सोबतच अभय देओलही यावेळी उपस्थित होता. संगीत सेरेमनी सर्वांनी मनसोक्त डान्स केला. त्यातून सनी देओल यांनीही त्याच्या लेकासाठी आपल्या चित्रपटातील गाण्यावर डान्स केला आहे. 'गदर 2' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे.

हेही वाचा - प्रभु श्रीरामाचे फोटो शेअर करत कंगना राणावतने साधला 'आदिपुरूष'वर निशाणा

यावेळी सनी देओल यांनी त्याच चित्रपटातील गेटअप केला होता आणि आपल्या लेकाच्या संगीत सेरेमनीमध्ये ते मनसोक्त नाचले. यावेळी त्यांनी कुर्ता आणि सलवार घातली होती. त्यांनी डोक्यावर पगडी घातली होती. व कोटही घातला होता. त्यांच्या या डान्स परफॉर्मन्स उपस्थितांचे लक्ष त्यांच्यावरच खिळले होते. यावेळी त्यांनी फूल एनर्जीसह डान्स केला होता. सध्या त्यांचा हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होतो आहे. त्यांच्या चेहऱ्यावर यावेळी नाचताना प्रचंड आनंद होता. त्यामुळे त्यांची एकच चर्चा रंगली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सनी देओल यांचा 'गदर 2' हा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यातून हा चित्रपट 11 ऑगस्टला रिलिज होणार आहे. तेव्हा या चित्रपटाची सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. त्यामुळे या चित्रपटाचीही जोरदार चर्चा रंगली आहे. त्यातून सनी देओलच्या लेकाच्या लग्नाचीही सध्या सगळीकडेच चर्चा आहे.