'तारक मेहता' मालिकेतील सुंदर-सोज्वळ सोनूचे अशा अवतारातले फोटो पाहून चाहते हैराण

तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील सोनूचा हा अवतार पाहून चाहते हैराण.

Updated: Oct 25, 2022, 07:47 PM IST
'तारक मेहता' मालिकेतील सुंदर-सोज्वळ सोनूचे अशा अवतारातले फोटो पाहून चाहते हैराण title=

Nidhi Bhanushali photos : तारक मेहता का उल्टा चष्मा (TMKOC) ही मालिका टीव्हीवरची सर्वात हिट कॉमेडी शोपैकी एक आहे. प्रेक्षकांचं गेल्या 14 वर्षांपासून ही मालिका मनोरंजन करत आहे. मालिकेत दिसणारी मुले आता बरीच मोठी झाली आहेत. या मालिकेत सोनूची भूमिका करणारी अभिनेत्री निधी भानुशाली खऱ्या आयुष्यात खूपच वेगळी दिसते. अभिनेत्री निधी भानुशाली हिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अनेक हॉट फोटो तिने शेअर केले आहेत. निधी तिच्या फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. (Nidhi Bhanushali saree Hot photos on Instagram)

अनेक जुन्या कलाकारांनी 'तारक मेहता' मालिकेला निरोप दिला. यापैकी एक नाव निधीचेही आहे. या शोने तिला एक खास ओळख दिली. मात्र, आता निधीने शो सोडल्याला 2 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे आणि यासह तिच्यातही बरेच बदल झाले आहेत. निधीचा बोल्डनेस नेहमीच चर्चेत असतो.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nidhi Bhanushali (@_ninosaur)

निधी भानुशाली सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिची बोल्ड स्टाइल पाहून युजर्सला देखील विश्वास बसत नाही. अभिनेत्रीने नुकताच तिचे 2 फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये ती ब्लू  रंगाच्या बिकिनीत दिसत आहे. तलावात पोहण्याचा आनंद लुटताना ती दिसत आहे.

अभिनेत्री निधी भानुशाली फक्त 20 वर्षांची आहे आणि तिने आपल्या बोल्ड अवताराने मोठ्या अभिनेत्रींशी स्पर्धा सुरू केलीये. तिचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत असतात. 9 लाखाहून अधिक लोकं तिला (Nidhi Bhanushali Insta) फॉलो करतात.