महिलांसाठी सुरक्षित जागा कोणती? प्रसिद्ध अभिनेत्रीला बलात्काराची धमकी

बलात्काराची धमकी मिळाल्यानंतर अभिनेत्रीला घ्यावी लागली पोलिसांची मदत  

Updated: Jun 15, 2022, 12:52 PM IST
महिलांसाठी सुरक्षित जागा कोणती? प्रसिद्ध अभिनेत्रीला  बलात्काराची धमकी title=

मुंबई : 'पांड्या स्टोअर' फेम अभिनेत्री सिमरन बुधरूपने नुकताच धक्कादायक खुलासा केला आहे. एका तरुण मुला-मुलींच्या ग्रुपने अभिनेत्रीला निशाण्यावर धरलं आहे. एवढंच नाही तर तरुण मुलांनी सिमरनला बलात्काराची धमकी देखील दिली आहे. धक्कादायक प्रकरणी अभिनेत्रीला पोलिसांची मदत घ्यावी लागली आहे. 'पांड्या स्टोअर' या टीव्ही मालिकेत ऋषिताची भूमिका साकारणाऱ्या सिमरन बुधरूपने नुकताच असा धक्कादायक खुलासा केला आहे.

एका मुलाखतीत अभिनेत्रीने धक्कादायक खुलासा केला आहे. ती म्हणाली, 'सोशल मीडियावर वरून मला जीवे मारण्याच्या नाही, तर बलात्काराच्या धमक्या मिळत आहेत. त्यामुळे मी पोलिसांची मदत घेतली असल्याचं अभिनेत्रीने यावेळी सांगितलं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

प्रसिद्ध अभिनेत्रींना अशा धमक्या मिळत असतील तर प्रत्येक महिला कोणत्या ठिकाणी सुरक्षित आहेत? असा प्रश्न याठिकाणी उपस्थित होत आहे. 'सोशल मीडियावरील तरुण-तरुणींच्या ग्रुपने मला टार्गेट करत शिविगाळ केल्यानंतर बलात्काराच्या धमक्या दिल्या असल्याचं देखील अभिनेत्रीने सांगितलं आहे. 

तरुण मुलांकडून मिळत असलेल्या धमक्यांबद्दल अभिनेत्री म्हणाली, 'आई-वडील मुलांना फोन देतात. पण मुलं मोबाईलचा वाईट कामांसाठी उपयोग करतात आणि पालकांच्या विश्वासाला ठेच पोहोचवतात.'